टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा अंतिम टप्पा जवळ आला आहे. या स्पर्धेतील दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबरला खेळले जाणार आहेत. यामध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होणार असून हा सामना ऍडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी कोणते खेळाडू उत्तम ही चर्चा सुरू असताना फलंदाजीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचे नाव पुढे येते, मात्र दोन्ही संघाच्या गोलंदाजी प्रदर्शनाकडे पाहिले तर इंग्लंडच्या खेळाडूंनी विरोधी संघाची चिंता वाढवली आहे.
कारकिर्दीत पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणारा अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) सध्या भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरत आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असणाऱ्या पुरूष क्रिकेट संघांच्या या आठवा हंगामात त्याने आतापर्यंत 10 विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेत अर्शदीपचा स्ट्राईक रेट 10.8 आहे. याचा अर्थ तो प्रत्येक 11व्या चेंडूवर विकेट घेत आहे. त्याने आतापर्यंत 18 षटक टाकताना 7.83च्या इकॉनॉमी रेटने 141 धावा दिल्या आहेत.
दुसरीकडे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचा स्ट्राईक रेट 11.2 आहे आणि त्याने या स्पर्धेत 8 विकेट्स घेतल्या आहेत. तो भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मोहम्मद शमी याने 4 सामन्यात 7 आणि आर अश्विन याने 5 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन हा टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
इंग्लंडकडून या स्पर्धेत सर्वाधिक विकेट इंग्लंडच्या सॅम करन याच्या नावावर आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 8.8 आहे. याचा अर्थ तो प्रत्येक नवव्या चेंडूवर विकेट घेतो. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजांने 4 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच इंग्लंडच्याच वेगवान गोलंदाज मार्क वूड याचा स्ट्राईक रेट 9.3 आहे. यामुळे दोघे उपांत्य फेरीत भारताची चिंता वाढवू शकतात. तसेच चालू स्पर्धेत सर्वात जलद चेंडू टाकण्याचा विक्रम वूडच्याच नावावर आहे. त्याने 155 किमी वेगाने चेंडू टाकला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुर्दैवच अन् काय! 2021मध्ये पदार्पण करणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंना विसरले राहुल द्रविड, ढुंकूनही नाही बघत
VIDEO: विराट कोहलीचा ‘माईंड गेम’! इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी शेयर केली ‘ही’ खास पोस्ट