रविवारी (23 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात बहुप्रतिक्षित सामना खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अर्शदीपने पाकिस्ताच्या सरावमीवीर जोडीला स्वस्तात बाद केले आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली. यादरम्यान अर्शदीपच्या नावापुढे एका खास विक्रमाची नोंद देखील झाली.
पाकिस्तानचा कर्णदार बाबर आझम (Babar Azam) आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) यांनी पाकिस्तान संघाच्या डावाची सुरुवात केली. पण ते संघासाठी अपेक्षित अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. युवा भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी चांगलाच चर्चेत आहे. पाकिस्तानविरुद्ध देखील त्याने असेच प्रदर्शन केले, जे चाहत्यांना हवे होते. अर्शदीपने बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. अर्शदीप पहिला असा गोलंदाज ठरला आहे, ज्याने पाकिस्तानच्या या दिग्गज सलामीवीर जोडीला एखाद्या सामन्यात एक आकडी धावसंख्येवर बाद केले असेल.
पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज त्यांच्या संघासाठी सर्वात महत्वाचे आहेत. त्यांचा मध्यक्रम मागच्या बऱ्याच दिवसांपासून धावा करण्यासाठी झगडताना दिसला आहे. बाबर आणि रिजवान यांनी पाकिस्तानला अनेक महत्वाचे सामने जिंकवून दिले आहेत. यामद्ये मागच्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा प्रामुख्याचा उल्लेख केला पाहिजे. भारताने या सामन्यात 10 विकेट्सने पराभव स्वीकारला होता. या दोघांपैकी एखादा फलंदाज जरी स्वस्तात बाद झाला, तरी दुसरा फलंदाज संघाचा डाव सावरतो, असे आजपर्यंत पाहायला मिळाले आहे.
परंतु, रविवारी भारताविरुद्ध खेळताना दोघेही स्वस्तात बाद झाल्यामुळे पाकिस्तान संघाची नक्कीच कोंडी झाली. कर्णधार बाबर या सामन्यात गोल्डन डक म्हणजेच पहिल्याच चेंडूवर शुन्य धावा करून बाद झाला. तर मोहम्मद रिजवानने 12 चेंडूत 4 धावा करून विकेट गमावली. अर्शदीपने भारताच्या डावातील दुसरे आणि चौथे षटक टाकले, ज्यामध्ये या विकेट्स त्याला मिळाल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मुंबईसह ‘हे’ पाच संघ मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल, पाहा यादी
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, यष्टीरक्षक म्हणून डीकेची संघात एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन