भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अर्शदीपने भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील चांगली गोलंदाजी करताना दिसला आहे. पण अर्शदीपच्या तुलनेत भुवनेश्वरने कमी विकेट्स घेतल्या आहेत. असे असले तरी, संघासाठी त्याची गोलंदाजी किफायतशीर ठरली आहे. अशातच अर्शदीपने स्वतःच्या चांगल्या गोलंदाजीचे श्रेय देखील भुवनेश्वरलाच दिले आहे.
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यांमधील दोन सामने भारताने जिंकले, तर एकामध्ये संघाला पराभव स्वीकारावा लागाल. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारतीय संघ पराभूत झाला. पण पराभवानंतर माध्यमांशी बोलताना अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) याचे कौतुक करताना दिसला. अर्शदीपच्या मते भुवनेश्वर कुमारविरुद्ध विरोधी संघाचे फळंदाज जोखीम घेणे टाळतात. पण त्याच्याविरुद्ध खेळताना फलंदाज अधिक जोखीम घेत आहेत. याच गोष्टीचा फायदा अर्शदीपला मिळत असल्याचे त्याने स्वतः म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागाल. सामना संपल्यानंतर बोलताना अर्शदीप म्हणाला आम्ही फलंदाजांच्या कमजोर बाबींवर लक्ष देत असतो. अर्शदीप म्हणाला, “मी आमि भुवनेश्वर भाई सुरुवातीच्या षटकांमध्ये काही प्रमाणात स्विग मिळवत आहोत. यामुळे आम्ही फलंदाजांना थकवण्याचा देखील प्रयत्न करत असतो. मी फलंदाजांना निशाण्यावर धरू शकत आहे कारण भुवनेश्वर संघासाठी किफायतशीर गोलंदाजी करत आहे. त्याच्या या गोलंदाजीमुळेच फलंदाज दबावात आहेत.”
भुवनेश्वरने विश्वचषक स्पर्धेत जास्त विकेट्स घेतल्या नसल्या, तरी त्याच्या स्विंग चेंडूचा सामना करताना विरोधी संघाचे फलंदाजाला विचार करावा लागत आहे. अर्शदीप पुढे बोलताना म्हणाला की, “माझ्या यशाचे श्रेय भुवनेश्वरला जाते. भलंदाज त्याच्या विरोधात जोखीम घेत नाहीयेत आणि माझ्यासमोर मात्र घेत आहेत. याच कारणास्तव आम्ही चांगली भागीदारी पार पाडली आहे. गोलंदाजांची भागीदारी तितकीच महत्वाची आहे, जितकी फलंदाजांची भागीदारी असते.”
दरम्यान अर्शदीपने भारतासाठी या टी-20 विश्वचषकात तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने पाच विकेट्स घेतल्या. दुसरीकडे भुवनेश्वरनेही संघासाठी हे तिन्ही सामने खेळले, पण त्याला मात्र तीन विकेट्सवर समाधान मानावे लागेल आहे. दरम्यान, भारतीय संघ सुपर 12 फेरीमध्ये ग्रुप दोनचा भाग आहे. ग्रुप दोनमध्ये सध्या दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराटची बीसीसीआयकडे विश्रांतीची विनंती? या महत्त्वाच्या मालिकेतून घेणार माघार
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये वॉर्नरची बॅट अद्याप शांतच, आयर्लंडविरुद्धही गमावली स्वस्तात विकेट