इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामामध्ये (2026) पंजाब किंग्सची (PBKS) टीम एकीकडे प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत असतानाच, दुसरीकडे त्यांचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) एका मोठ्या वादात अडकला आहे. मुंबई इंडियन्सचा खेळाडू तिलक वर्मा (Tilak verma) याच्यावर सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये ‘वादातीत टिप्पणी’ केल्यामुळे अर्शदीपवर बरीच टीका होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता पंजाब किंग्सच्या टीम मॅनेजमेंटने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर अर्शदीप सिंगचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तो तिलक वर्माला ‘ओय अंधरे’ असं म्हणताना दिसला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सनी तीव्र संताप व्यक्त केला आणि अर्शदीपच्या या वक्तव्याला रंगभेदाशी संबंधित टिप्पणी मानून त्याच्यावर जोरदार टीका केली. या हंगामामधील पंजाब किंग्सचा 13 वा सामना धर्मशाला येथील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होणार आहे. या मॅचच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत पंजाब किंग्सचे ‘हेड ऑफ स्पोर्ट्स सायन्स’ अँड्र्यू लीपस यांनी अर्शदीप सिंगच्या वादावर टीमची बाजू मांडली.
अर्शदीपवर काही फरक पडलेला नाही, अँड्र्यू लीपस म्हणाले की, अर्शदीपचे वागणे पूर्णपणे नॉर्मल आहे. तो एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे आणि सोशल मीडियावरील या चर्चांमुळे त्याच्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही. या वादामुळे टीमच्या मानसिकतेवर कोणताही परिणाम झालेला नसून सध्या टीममधील वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे.
या मुद्द्यावर पुढे बोलताना अँड्र्यू लीपस यांनी आजच्या खेळाडूंच्या लाईफस्टाईलवरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आजकालचे खेळाडू सोशल मीडिया आणि मोबाईलवर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवत आहेत, जी एक मोठी समस्या बनत चालली आहे. अगदी टीम बसमध्ये प्रवास करतानाही सगळे खेळाडू आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. यामुळे त्यांच्यातील आपापसातील संवाद खूप कमी झाला आहे, ही खरोखरच चिंतेची बाब आहे.
आयपीएल 2026 मधील अर्शदीपची कामगिरी पाहिल्यास, या हंगामामध्ये अर्शदीप सिंगला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने आहे. अर्शदीपचा इकॉनॉमी रेट जवळपास पावणे दहाच्या आसपास (9.69) राहिल्यामुळे धावा रोखण्यात तो अपयशी ठरल्याचे दिसत आहे.





