---Advertisement---

अर्जन नागवासवालाचा मोठा खुलासा, प्रारंभीच्या काळात ‘या’ भारतीय गोलंदाजाची करायचा कॉपी

On: सोमवार, मे 17, 2021 8:36 PM
---Advertisement---

भारतीय संघ १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करेल. काही दिवसांपूर्वीच या सामन्यासाठीचा भारतीय संघ जाहीर झाला होता. ज्यात राखीव खेळाडू म्हणून अर्जन नगवासवाला या खेळाडूचा समावेश करण्यात आला होता.
आता त्याने आपल्या कारकिर्दीबाबत महत्वाचा खुलासा केला आहे. त्याने आपण कारकिर्दीच्या प्रारंभी जहीर खान सारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायचो, असे सांगितले आहे. इंडिया न्यूजशी बोलतांना त्याने या गोष्टीचा उलगडा केला.

“जहीर खान होता आदर्श”
अर्जन नगवासवाला हा जहीर खान प्रमाणेच डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी शैली देखील जहीर खानशी मिळत-जुळती आहे. इतकेच नाही तर अर्जन नगवासवाला मुंबई इंडियन्सच्या ताफ्याचा देखील भाग होता. त्या दरम्यान देखील जहीर खानचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. मुंबई इंडियन्सने एक फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यात जहीर खान आणि अर्जन नगवासवाला या दोघांचीही गोलंदाजी शैली किती सारखी आहे, हे दिसून येत होते.

https://www.instagram.com/p/COzgkZQKvKo/?utm_source=ig_embed&ig_rid=14d34230-1349-4430-b34c-caaec81bd138

याबद्दल बोलतांना तो म्हणाला, “मी तो मुंबई इंडियन्सने शेअर केलेला फोटो पाहिला होता. हा फोटो पाहून मी निशब्द झालो होतो. त्या माझ्या भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. मी जहीर खानच्या गोलंदाजीचे व्हिडिओ पाहूनच गोलंदाजीचे मूलभूत तंत्र शिकले होते. इतकेच नव्हे तर मी जहीर खानची नक्कल करण्याचा पण प्रयत्न केला होता. मी त्याच्याच पद्धतीने रन-अप आणि उडी मारण्याचा प्रयत्न करत असे.”

अर्जन नागवासवालाची कारकीर्द –
अर्जन नागवासवाला हा गुजरात कडून खेळणारा २३ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. गुजरातकडून त्याने आत्तापर्यंत २० अ दर्जाचे सामने खेळले आहेत. ज्यात त्याने २१.७६ च्या सरासरीने ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याने एकूण १६ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात २२.५३ च्या सरासरीने ६२ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: नवदीप सैनीने केली नव्या थारची अनोखी टेस्टिंग; खराब, कच्च्या रस्त्यांवरच नाही, तर नाल्यातही चालवली महागडी गाडी

व्हिडिओ : कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कोहलीची विकेट घेणार का? साउदीने दिले ‘हे’ उत्तर

केएल राहुल जाणार का इंग्लंड दौऱ्यावर? दुखापतीबद्दल आलेत ‘हे’ अपडेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---