---Advertisement---

विराट समोर शाहरुख-सलमान फिके; किंग कोहली भारतातील सर्वात माैल्यवान सेलिब्रिटी

On: मंगळवार, जून 18, 2024 6:27 PM
---Advertisement---

विराट कोहली मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील चाहत्यांचा लाडका आहे. विराटचे भारतासह जगभरात अनेक चाहते आहेत. विराट कोहलीची गणना सर्वाधिक फॉलो केलेल्या खेळाडूंमध्ये केली जाते. या दरम्यान आता विराट कोहली भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीने शाहरुख खान, सलमान खान आणि रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. खरंतर आता बॉलिवूड सेलिब्रिटी असो की क्रिकेटर, विराट कोहलीने सगळ्यांना मागे टाकत अव्वल स्थानी पोहचला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 1901 कोटी रुपये झाली आहे. तर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यू 1693 कोटी रुपये आहे. याशिवाय शाहरुख खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू 1001 कोटी रुपये आहे. वास्तविक, विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये जवळपास 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विराट कोहली सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषक खेळत आहे.

टी20 विश्वचषक 2024 मध्ये विराट कोहलीचा फाॅर्म खराब दिसून आला आहे. कोहलीने रोहित शर्मा सोबत सालामी केली आहे. आतापर्यंत विश्वचषकाच्या साखळी सामन्यात त्याने तीन सामन्यात केवळ 5 धावा केल्या आहेत. अमेरिका विरुद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. परंतु विराट कोहली महान फलंदाज आहे, येणाऱ्या सिपर-8 मधील सामन्यात तो त्याचे काैशल्य दाखवल्या शिवाय राहणार नाही. सुपर-8 मधील भारताचा पहिला सामना 20 रोजी अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे.

महत्तवाच्या बातम्या-

IND vs AFG सामन्यात टाॅस जिंकणारा संघ जिंकेल सामना, माजी प्रशिक्षकानं केली भविष्यवाणी
सुपर-8 सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; सरावादरम्यान स्टार खेळाडूला दुखापत
स्मृती मानधनानं आयसीसी क्रमवारीत मारली मुसंडी!

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---