भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने श्रीलंकेला २३८ धावांनी पराभूत केले. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला गेला. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप देत मालिका जिंकली आहे. या मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला आहे. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी मोठे विक्रम केले आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. (Karunaratnes century)
श्रीलंका संघ भारताविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत काही खास कामगिरी करू शकला नाही. ही कसोटी तीन दिवसातच संपली. दिवस-रात्र कसोटीतील पराभवानंतर श्रीलंकेचे खेळाडू खूप नाराज असल्याचे दिसले. या सामन्यात केवळ एकच खेळाडू यशस्वी झाला तो म्हणजे कर्णधार दिमुथ करुणारत्ने. त्याने शतक झळकावले.
श्रीलंकेच्या कर्णधाराने दुसऱ्या डावात तणावाच्या परिस्थितीमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात काही खास कामगिरी केली नसली, तरी दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात ४ धावा केल्या होत्या. त्याने दुसऱ्या डावात १७४ चेंडूत १०७ धावा केल्या आहेत. यासाठी भारतीय खेळाडूंनी त्याची प्रशंसा केली.
https://twitter.com/addicric/status/1503344818109382659?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1503344818109382659%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fvirat-kohli-saluted-the-performance-of-the-opposition-player-like-this%2F
विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंकेच्या कर्णधाराने शतक पूर्ण करताच टाळ्या वाजवू लागला. कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यातून विराटने एक संदेश दिला आहे की, आपल्या विरोधी संघाचे कौतुक करण्यातसुद्धा मागे हटले नाही पाहिजे.
या मालिकेत भारताकडून रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पहिल्या कसोटीत १७५ धावा केल्या आणि ९ विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने कपिल देव यांचा विक्रम मोडत ४३५ हून अधिक विकेट्स घेतल्या. तो सध्या सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत आठव्या क्रमांंकावर पोहोचला आहे. तसेच रिषभ पंतने पहिल्या कसोटीत ९६ धावा केल्या आणि श्रेयस अय्यरने दुसऱ्या दोन्ही डावात अर्धशतकीय खेळी केली. तो दिवस-रात्र कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतकीय खेळी खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टिक टिक बुम! रोहित आणि बुमराह पोहोचले मुंबईत, ‘पलटण’ने शेअर केला झक्कास व्हिडिओ
सुपर ओव्हरमध्येही फायनलचा निकाल न लागल्यास ‘असा’ ठरणार विजेता, आयपीएल २०२२चे नवे नियम वाचलेत का?
बिनधास्त ‘जड्डू’ची खुद्द कपिल देव यांनी थोपटली पाठ; म्हणाले, ‘मला त्याची खेळी आवडली, कारण…’