भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ गुरुवारी (23 फेब्रुवारी) आमने सामने आले. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (ICC Womens T20 World Cup) 2023चा हा उपांत्य सामना होता. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात भारताची वरची फळी अवघ्या 28 धावांवर गुंडाळळी गेली. स्मृती मंधाना नेहमीप्रमाणे आयसीसीच्या बाद फेरीत पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना तुफान फटकेबाजी केली आणि 20 षटकात 172 धावा केल्या. चार विकेट्सच्या नुकसानावर ऑस्ट्रेलियाने या धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघासाठी सलामीवीला आलेल्या खेळाडूंकडून चांगली सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, तसे काही होऊ शकले नाही. अनुभवी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने या महत्वाच्या सामन्यात चाहत्यांची चांगलीच निराशा केली. अवघ्या 2 धावा करून स्मृतीने विकेट गमावली. दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा स्मृती मंधाना अशा पद्धतीने आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत स्वस्तात बाद झाली आहे. यापूर्वीही अशा पद्धतीने बाद फेरीत खेळताना स्मृतीने 6, 0, 34, 11 आणि गुरुवारी 2 अशा खेळी केल्या आहेत.
स्मृतीच्या साथीने या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेली शेफाली वर्मा देखील अवघ्या 9 धावा करून बाद झाली. स्मृतीने 5 तर शेफालीने 6 चेंडू खेळून या धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या यास्तिका भाटिया देखील 7 चेंडूत 4 धावा केल्या आणि विकेट गमावली. वरची फली अशा पद्धतीने स्वस्तात बाद झाल्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या मध्यक्रमातील जोडीवर दबाव वाढला. जेमिमाह आणि हरमनप्रीने चौथ्या विकेटसाठी 41 चेंडूत 69 धावांची खेळी केली. पण डाव रंगात आला असतानाच जेमिमाहने डर्सी ब्राउन (Darcie Brown) हिच्या चेंडूवर विकेट गमावली.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार मेग लेनिंग हिने 49, तर सलामीवीर बेथ मुनी हिने 54 धावांची झंजावाती खेळी केली होती. त्याव्यतिरिक्त एश्ले गार्डनरने 31, तर एलिसा हेलीने 25 धावांचे योगदान दिले. (As usual this time also Smriti Mandhana failed in the semi-final match, see how the previous record is)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत! फॉर्ममध्ये येण्यासाठी हातात बाकी आहेत थोडेच दिवस
“मला टीम इंडियाला या वर्षात दोनदा जगज्जेता होताना पाहायचेय”, गावसकरांनी व्यक्त केली इच्छा