---Advertisement---

अफगाणिस्तानच्या असगर अफगाणचा निवृत्तीचा निर्णय, काही दिवसांपूर्वीच धोनीला पछाडत ठरलेला यशस्वी टी२० कर्णधार

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 2:36 AM
---Advertisement---
अफगाणिस्तानचा माजी दिग्गज कर्णधार असगर अफगाणने शनिवारी(३० ऑक्टोबर) निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ही घोषणा करताना सांगितले की सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात नामिबियाविरुद्ध रविवारी (३१ ऑक्टोबर) होणारा सामना त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरचा सामना असणार आहे. रविवारी अफगाणिस्तान विरुद्ध नामिबिया संघात अबुधाबी येथे टी२० विश्वचषकातील सामना रंगणार आहे.

असगर अफगाणने त्याच्या कारकिर्दीत ६ कसोटी, ११४ वनडे आणि ७५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील आत्तापर्यंतच्या प्रगतीमधील तो महत्त्वाचा सदस्य राहिला असून त्याच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तानने जागतिक क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.

त्याने ६ कसोटी सामने खेळताना १ शतक आणि ३ अर्धशतकांसह ४४ च्या सरासरीने ४४० धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने १ शतक आणि १२ अर्धशतकांसह २४२४ धावा केल्या आहेत. तर, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याने १३५१ धावा केल्या आहेत. कसोटीत १६४ धावांची त्याची सर्वोच्च खेळी आहे. याशिवाय त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ विकेट्सही आहेत.

३३ वर्षी अफगाणनने २००९ साली स्कॉटलंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेत त्याने आत्तापर्यंत ११५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत अफगाणिस्तानचे नेतृत्त्वही केले आहे. तो अफगाणिस्तानचा पहिला कसोटी कर्णधारही राहिला. अफगाणिस्तानने २०१८ मध्ये भारताविरुद्ध खेळलेला त्यांचा पहिला-वहिला कसोटी सामना अफगाणच्याच नेतृत्वाखाली खेळला होता.

याशिवाय अफगाण आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने हा विश्वविक्रम एमएस धोनीला मागे टाकत आपल्या नावे केला होता. त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ४२ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर त्याच्या नावावर कर्णधार म्हणून सर्वाधिक सलग आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्याचा विक्रमही आहे. त्याने ४६ सलग टी२० सामन्यांत अफगाणिस्तानचे नेतृत्व केले होते.

सध्या तो टी२० विश्वचषकात मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली खेळत असून या स्पर्धेत सुपर १२ फेरीतील दुसऱ्या गटात अफगाणिस्ताने पहिल्या २ सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऍरॉन फिंचचा इंग्लंडविरुद्ध टी२० मध्ये मोठा विक्रम! कोहलीला मागे टाकत ‘या’ यादीत मिळवले अव्वल स्थान

न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवायचा असल्यास ‘हे’ तीन निर्णय टीम इंडियासाठी ठरू शकतात फायदेशीर

न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतात मोठे बदल, ‘अशी’ असू शकते प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---