---Advertisement---

तब्बल १५ महिन्यांनी कसोटीत पुनरागमन करत स्मिथने तोडला विराट कोहलीचा हा विक्रम

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2019 12:37 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। गुरुवारपासून (1 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना एजबस्टन स्टेडियमवर सुरु असून पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद 284 धावा केल्या आहेत. तर इंग्लंड पहिल्या डावात बिनबाद 10 धावांवर खेळत आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्मिथने 219 चेंडूत 144 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले. हे स्मिथने 24 वे कसोटी शतक होते. तसेच त्याने हे शतक त्याच्या 118 व्या डावात खेळताना केले.

त्यामुळे तो कसोटीमध्ये सर्वात जलद 24 शतके करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

हा विक्रम करताना त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने 123 डावात 24 वे कसोटी शतक केले होते. या यादीत अव्वल क्रमांकावर महान फलंदाज डॉन ब्रॅडमन असून त्यांनी 66 डावात 24 कसोटी शतके केली होती.

स्मिथवर मागीलवर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाडप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षाची बंदी घातली होती. या बंदीनंतर स्मिथने ऍशेसच्या पहिल्या सामन्यातून कसोटीमध्ये तब्बल 15 महिन्यांनी पुनरागमन केले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. 122 धावावर 8 विकेट अशी अवस्था ऑस्ट्रेलियाची असताना स्मिथला पिटर सिडल(44) आणि नॅथन लायन(12*) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

कसोटीमध्ये सर्वात जलद 24 शतके करणारे फलंदाज – 

66 डाव – डॉन ब्रॅडमन

118 डाव – स्टिव्ह स्मिथ

123 डाव – विराट कोहली

125 डाव – सचिन तेंडुलकर

128 डाव – सुनील गावस्कर

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आता मास्टर-ब्लास्टर करणार या चित्रपटात भूमिका…

ऍशेसच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडला जोरदार धक्का, हा खेळाडू गेला मैनादाबाहेर

क्रिकेट क्षेत्रातील बेकारी वाढली, कोचच्या पदासाठी आले हजारो अर्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment