---Advertisement---

मानाच्या ऍशेस मालिकेला ‘या’ दिवशी होणार सुरुवात; २६ वर्षांनंतर पहिल्यांदाच पर्थमध्ये होणार अखेरचा सामना 

On: बुधवार, मे 19, 2021 10:15 AM
---Advertisement---

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला आणि पुरुष संघांचे बुधवारी (१९ मे) २०२१-२२ उन्हाळी हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकात यावर्षाच्या अखेरिस होणाऱ्या ऍशेल मालिकेचाही समावेश आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुरुषांच्या ऍशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथून सुरुवात होईल. तसेच १६ डिसेंबरपासून ऍडलेड येथे होणाऱ्या दुसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र खेळवला जाईल. तिसरा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असल्याने २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे सुरु होईल. तर चौथा आणि पाचवा कसोटी सामना नव्या वर्षात अनुक्रमे सिडनी आणि पर्थ येथे खेळवला जाईल.

सध्या ऍशेसची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे असून ती कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल, तर इंग्लंड ती ट्रॉफी आपल्याकडे मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. विशेष म्हणजे २६ वर्षांत पहिल्यांदाच ऍशेस मालिकेचा अखेरचा सामना सिडनी ऐवजी पर्थमध्ये होणार आहे.

या ऍशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळेल. हा सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान होईल.

ऍशेस मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया पुरुष संघ न्यूझीलंड विरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिका खेळेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान ३ वनडे आणि १ टी२० सामना होईल. त्यानंतर ११ ते २० फेब्रुवारीदरम्यान श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया पुरुष संघ ५ टी२० सामने खेळेल. या मालिकेसह ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचा हा उन्हाळी हंगाम संपेल.

महिला संघाचे वेळात्रक – 
ऑस्ट्रेलिया महिला संघाचा उन्हाळी हंगाम भारताविरुद्धच्या सामन्यांनी होईल. तरी अजून भारताविरुद्ध कोणत्या प्रकारच्या मालिका होणार आहेत, हे निश्चित झालेले नाही. त्यानंतर जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात महिला ऍशेसला सुरुवात होईल. तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका मिळून महिलांची ही ऍशेस ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत २७ ते ३० जानेवारीदरम्यान एकमेव कसोटी सामना होईल. त्यानंतर ३ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका होईल. महिलांची ऍशेस २०२२ स्पर्धा २७ जानेवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत चालेल. या स्पर्धेत जो संघ अधिक गुण मिळवेल तो विजेता असेल.

वनडे आणि टी२० सामना जिंकणाऱ्या संघाला २ गुण मिळतील. तर पराभूत होणाऱ्या संघाला गुण मिळणार नाहीत. तसेच सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना १ गुण मिळेल. तसेच कसोटी सामना जिंकणाऱ्या संघाला ४ गुण मिळतील. सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी २ गुण मिळतील.

या स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलिया महिला संघ न्यूझीलंडला रवाना होईल. तिथे महिला विश्वचषक खेळला जाणार आहे.

असे आहे २०२१-२२ वर्षातील उन्हाळी हंगामाते ऑस्ट्रेलियन संघाचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलिया पुरुष संघ – 

२७ नोव्हेंबर – १ डिसेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, बेलेरिव्ह ओव्हल

ऍशेस मालिका – (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड)
८-१२ डिसेंबर – पहिला कसोटी सामना, ब्रिस्बेन
१६-२० डिसेंबर – दुसरा कसोटी सामना, ऍडलेड (दिवस-रात्र)
२६-३० डिसेंबर – तिसरा कसोटी सामना, मेलबर्न
५-९ जानेवारी – चौथा कसोटी सामना, सिडनी
१४-१८ जानेवारी – पाचवा कसोटी सामना, पर्थ

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड
वनडे मालिका – 
३० जानेवारी – पहिला वनडे सामना, पर्थ
२ फेब्रुवारी – दुसरा वनडे सामना, बेलेरिव्ह ओव्हल
५ फेब्रुवारी – तिसरा वनडे सामना, सिडनी
टी२० मालिका – 
८ फेब्रुवारी – एकमेव टी२० सामना, मनुका ओव्हल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, टी२० मालिका
११ फेब्रुवारी – पहिला टी२० सामना, सिडनी
१३ फेब्रुवारी – दुसरा टी२० सामना, ब्रिस्बेन
१५ फेब्रुवारी – तिसरा टी२० सामना, कॅरारा स्टेडियम
१८ फेब्रुवारी – चौथा टी२० सामना, ऍडलेड
२० फेब्रुवारी – पाचवा टी२० सामना, मेलबर्न

ऑस्ट्रेलिया महिला संघ – 
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – अजून वेळापत्रक निश्चित नाही

ऍशेस २०२२ (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड)
२७-३० जानेवारी – एकमेव कसोटी, मनुका ओव्हल
४ फेब्रुवारी – पहिला टी२० सामना, नॉर्थ सिडनी ओव्हल
६ फेब्रुवारी – दुसरा टी२० सामना, नॉर्थ सिडनी ओव्हल
१० फेब्रुवारी – तिसरा टी२० सामना, ऍडलेड
१३ फेब्रुवारी – पहिला वनडे सामना, ऍडलेड
१६ फेब्रुवारी – दुसरा वनडे सामना, जंक्शन ओव्हल
१९ फेब्रुवारी – तिसरा वनडे सामना, जंक्शन ओव्हल

महत्त्वाच्या बातम्या – 

आणखी काय हवं? आयपीएलमध्ये ३२० धावा करणाऱ्या दिग्गजाला दक्षिण आफ्रिकेने केले दुर्लक्ष, कारण अजूनही अस्पष्ट

‘युनिव्हर्स बॉस’ची बातच न्यारी! गेलने चक्क समुद्रात मारले पुशअप्स, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

आयपीएलमधील खेळाडूंना विश्रांती, तर २ युवा खेळाडूंना संधी; इंग्लंडने केली १५ जणांच्या कसोटी संघाची घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---