क्रिकेटविश्वातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील पाचवा अखेरचा सामना गुरुवारी (27 जुलै) लंडन येथील ओव्हल मैदानावर सुरू झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने मालिकेत प्रथमच नाणेफेक जिंकली.
दोन तुल्यबळ संघांमधील या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने शानदार खेळ दाखवत विजय संपादन केला होता. त्यानंतर इंग्लंडने पुनरागमन करत तिसरा कसोटी सामना जिंकला. चौथ्या सामन्यात इंग्लंड संघ आघाडीवर असताना पाचव्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना अनिर्णित राहिला. यामुळे ऑस्ट्रेलियाने ऍशेस आपल्याकडे राखण्याची यश मिळवले.
या पाचव्या सामन्यासाठी इंग्लंडने आपला चौथ्या सामन्यातील संघ कायम ठेवला. तर ऑस्ट्रेलियाने संघात एक बदल करताना अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याच्या जागी फिरकीपटू टॉड मर्फी याला संधी दिली.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्राऊली, बेन डकेट, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, टॉड मर्फी.
बातमी अपडेट होत आहे
(Ashes 2023 Australia Won Toss And Elected To Field First At Oval)
महत्त्वाच्या बातम्या-
विरोधी संघांनो सावधान! वनडे विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडचा जबरदस्त खेळाडू फिट, लगेच वाचा
वेस्ट इंडिज मालिका एवढी महत्त्वाची आहे तरी का? कॅप्टन रोहितने सांगितलं मोठं कारण