इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्या दिवशी स्टीव स्मिथ आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यो डावात 4 बाद 116 धावा केल्या आहेत. स्मिथच्या कारकिर्दीतील हा 100वा कसोटी सामना असला, तर ऑस्ट्रेलियन दग्गजाला हा सामना आठवणीत ढेवण्यासारखी कामगिरी करता आली नाहीये.
स्टीव स्मिथ (Steve Smith) गुरुवारी (6 जुलै) आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात आला. पहिल्या डावात त्याने 31 चेंडूत 22 धावा करून विकेट गमावली. तर शुक्रवारी (7 जुलै) म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या डावात तो अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. कारकिर्दीतील महत्वाच्या सामन्यात आपल्याला मोठी खेली करता आली नाही, याची खंत स्मिथच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. अशातच इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि स्मिथ यांच्यातील वातावरण तापल्याचेही पाहायला मिळाले.
शुक्रवारी दुसऱ्या डावातील 28व्या षठकात ऑस्ट्रेलियाने तिसरी विकेट गमावली. ही विकेट होती स्टीव स्मिथची, जी मोईन अलीला मिळाली. मोईन अलीच्या चेंडूवर त्याने स्लिप्समध्ये बेन डकेतच्या हातात झेल दिला होता. इंग्लंडला ही विकेट मिळाल्यानंतर यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने स्मिथला डिजवण्याचा प्रयत्न केला. दोघांमधील ही चर्चा स्टंप्स माईकमध्ये कैद झाली. सुरुवातील बेअरस्टोने स्मिथसाठी एक खास शब्द वापरला, जो स्मिथलाही समजू शकला नाही. यावर स्मिथ रागाच्या स्वरात विचारतो, “तु काय म्हणाला मित्रा?” यावर बेअरस्टो उत्तर देतो की, “चिअर्स! लवकरच पुन्हा भेटू.” एवढे झाल्यानंतर सुदैवाने दोन्ही खेळाडूंना आपली वाट धरली आणि वाद पुढे वाढला नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"See ya, Smudge!" 👋
"What was that, mate?!? HEY!" 😠
Jonny Bairstow getting in Steve Smith's head 👀 pic.twitter.com/PyTKFuaC4s
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 7, 2023
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर हेडिंग्लेवर फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांना अधिक फायदा मिळत आहे. पहिल्या डावात इंग्लंडसाठी मार्क वुड याने 5, तर ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्सने 6 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात डावात ऑस्ट्रेलियाने 263, तर प्रत्युत्तरात इंग्लंड संग 237 धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 26 धावांची आघाडी मिळाली असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 116 धावा केल्या आहेत. (Ashes 2023 Jonny Bairstow “See ya, Smudge!” then Smith says, “What was that, mate?!? HEY!”)
महत्वाच्या बातम्या –
‘बिचारा कुलदीप’, बागेश्वर बाबासोबत फिरकीपटूचा फोटो व्हायरल होताच चाहत्याची लक्षवेधी कमेंट
WI vs IND । पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडीजचा 13 सदस्यीय संघ घोषित! स्टार खेळाडू संघातून बाहेर