जेव्हा कोणताही खेळाडू निवृत्ती घेतो, तेव्हा त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे, आपल्या संघाला विजयी करूनच मैदान सोडणे. तो खेळाडू जेव्हा असे करण्यात यशस्वी होतो, तेव्हा त्याच्यासोबत मैदानातील सर्व प्रेक्षकही जल्लोष केल्याशिवाय राहत नाहीत. असेच काहीसे आता इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्यासोबत घडले आहे. सोमवारी (दि. 31 जुलै) ऍशेस 2023 मालिकेच्या अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन करत 49 धावांनी सामना जिंकला. या विजयात ब्रॉडचे मोलाचे योगदान होते.
खरं तर, ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 135 धावा केल्या होत्या. मात्र, 384 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ पाचव्या दिवशी 334 धावांवरच ढेपाळला. अशाप्रकारे इंग्लंड संघाने 49 धावांनी सामना जिंकत मालिका 2-2ने बरोबरीत सोडवली.
ऍलेक्स कॅरेची अखेरची विकेट
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने अखेरची विकेट घेऊन इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला. 92व्या षटकात जोश हेजलवूड मोईन अली याच्या चेंडूवर बाद होता-होता वाचला होता. मात्र, ब्रॉडने 95व्या षटकातील चौथा चेंडू टाकला, तेव्हा 28 धावांवर खेळत असलेल्या ऍलेक्स कॅरे (Alex Carey) याने यष्टीजवळ रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची कड घेत यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो याच्या हातात गेला. त्यानेही कुठली चूक न करता शानदार झेल पकडत कॅरेला तंबूत पाठवले. अशाप्रकारे ब्रॉडने सामन्याची आणि कारकीर्दीची अखेरची विकेट घेत इंग्लंडला शानदार विजय मिळवून दिला.
ब्रॉडच्या वडिलांचा आनंद गगनात मावेना
ब्रॉडने ही विकेट घेताच, स्टेडिअममध्ये बसलेल्या त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचे वडील आणि माजी क्रिकेटपटू ख्रिस ब्रॉड (Chris Broad) यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता. यादरम्यानचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
A fairytale ending for a legend of the game.
Broady, thank you ❤️ #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/RUC5vdKj7p
— England Cricket (@englandcricket) July 31, 2023
ब्रॉडची सामन्यातील कामगिरी
ख्रिस ब्रॉड याने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 4 विकेट्स घेतल्या. ब्रॉडच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने इंग्लंडकडून 167 सामने खेळताना 604 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने 121 सामन्यात 178 विकेट्स, तर 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 65 विकेट्स घेतल्या आहेत. (ashes 2023 stuart broad takes last wicket in international cricket father chris broad cheered in stands see here)
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा दिग्गज माजी कर्णधार ऍलिस्टर कूकचा खळबळजनक खुलासा! म्हणाल, ‘पुनरागमन करणार होतो, पण…’
मालिका खिशात घालण्यासाठी ब्रायन लारा स्टेडिअमवर उतरणार भारत अन् वेस्ट इंडिज; कोण कुणावर भारी? वाचाच