---Advertisement---

पाचवी ऍशेस कसोटी दुसऱ्याच दिवशी रोमांचक अवस्थेत; स्मिथच्या खांद्यावर ऑस्ट्रेलियाची जबाबदारी

On: शनिवार, जानेवारी 15, 2022 9:38 PM
ashes
---Advertisement---

जगातील सर्वात प्रतिष्ठित कसोटी मालिका म्हणून ओळखली जाणारी ऍशेस मालिका (Ashes Series) सध्या सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अत्यंत रोमांचक खेळ पाहायला मिळाला. ज्यामुळे ही पाचवी कसोटी निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पुनरागमन करत असलेल्या ट्रेविस हेडच्या शतकाच्या व युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनच्या अर्धशतकाच्या जोरावर २४१ पर्यंत मजल मारलेली. दुसर्‍या दिवशी त्यांचे उर्वरित चार फलंदाज लवकर बाद झाले व ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडसाठी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले होते.

त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव या मालिकेत ज्याप्रकारे इंग्लंडची अवस्था झाली आहे, तसाच राहिला. कर्णधार पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क यांनी अनुक्रमे ४ व ३ बळी घेत इंग्लंडची दयनीय अवस्था केली. या दोघांच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचा डाव ४७.४ षटकामध्ये १८८ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडचा एकही फलंदाज अर्धशतक ठोकू शकला नाही. अष्टपैलू ख्रिस वोक्स याने सर्वाधिक ३६ धावा केल्या.

दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, पहिल्या डावातप्रमाणे यावेळी देखील त्यांची सुरुवात खराब झाली. स्टुअर्ट ब्रॉड याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला खातेही खोलता तंबूचा रस्ता दाखवला. तसेच, मार्नस लॅब्युशेन ५ धावांवर माघारी परतला. उस्मान ख्वाजा हादेखील ११ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा नाईट वॉचमन स्कॉट बोलँड ३ व स्टीव्ह स्मिथ १७ धावांवर खेळत आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली तर या सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीही लागू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आदर्शवत’ अशीच राहिली विराटची नेतृत्व कारकीर्द; कोणालाही न जमलेले केलेत अनेक पराक्रम (mahasports.in)

विराटचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा! पद सोडताना लिहिली भली मोठी पोस्ट, वाचा काय म्हटलंय… (mahasports.in)

विराटने कसोटी कर्णधारपद सोडताना का घेतले धोनीचे नाव? नक्की काय ठरलं याला कारण? (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---