पुणे। मॅरेथॉन शर्यतीत आपला वेगळा ठसा उमटविणारे, प्रदीर्घ काळ सायकलिंग करणारे बास्केटबॉलपटू पुणेकर आशिष कासोदेकर यांनी अल्ट्रा डायनामो या सर्वाधिक सलग 59दिवस (दररोज 42.195किमी) अंतर धावण्याचा जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या इटली, ट्यूरिनच्या एन्झो कॅपोरासो याने केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. एन्झो याने 2019मध्ये 14 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत हा विक्रम नोंदविला होता.
फिट इंडिया मूव्हमेंटच्या माध्यमातून आशिष कासोदेकर यांनी आतापर्यंत 28 नोव्हेंबर 2021 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीत सलग 59दिवस(दरदिवशी 42.195किमी अंतर) धावून यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आशिष आता अवघ्या काही तासातच आपल्या 60 दिवसांत 60 मॅरेथॉन पूर्ण करून जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झाला आहे व या विक्रमाची दखल गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.
आज, 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनी आशिष कासोदेकर सकाळी 9 वाजता आपल्या जागतिक विक्रमाला गवसणी घालतील. याप्रसंगी भारतीय ऍथलिट शायनी अब्राहीम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, ट्रॅव्हल टाईमचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह संस्थापक विवेक काळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे अल्ट्रा डायनामोचे संस्थापक व स्पर्धा संचालक अरविंद बिजवे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरजला दिले जाणार परम विशिष्ट सेवा मेडल, वाचा त्या पदकाबद्दल
प्रिमियर हँडबॉल लीगने महाराष्ट्र आयर्नमेन ‘या’ चौथ्या फ्रँचायझीचे केले अनावरण