मागील महिन्यात 31 मार्चपासून सुरू झालेली आयपीएल 2023 स्पर्धा अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत पार पडलेले 31 सामने खूपच रोमांचक ठरले. यादरम्यान मागील काही वर्षे फॉर्मशी झगडणाऱ्या खेळाडूंना लय सापडली, काहींनी धावांचा पाऊस पाडत विक्रमांचे मनोरे रचले. काहींनी शेवटच्या षटकात अस्सल गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्याची कामगिरी केली. अशीच कामगिरी गुजरात टायटन्स संघाचा धाकड गोलंदाज मोहित शर्मा यानेही करून दाखवली. मोहितच्या गोलंदाजीच्या जोरावर आयपीएलच्या 30व्या सामन्यात गुजरातने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला. यामागे गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा याच्या संदेशाचे महत्त्व खूपच जास्त होते.
या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 135 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघ मजबूत स्तिथीत वाटत होता. मात्र, शेवटच्या षटकात संपूर्ण बाजी पलटली. लखनऊला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 128 धावाच करता आल्या. त्यामुळे गुजरातने 7 धावांनी विजय मिळवला.
आशिष नेहराने पाठवला संदेश
हा विजय मिळवण्यामागे गुजरातचा गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा याचे मोलाचे योगदान ठरले. तो 19व्या षटकात कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि गोलंदाजांना संदेश पाठवत राहिला. लखनऊला 2 षटकात विजयासाठी फक्त 17 धावांची गरज होती. लखनऊचा विजय पक्का मानले जात होते. कारण, कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने शानदार फलंदाजीच्या जोरावर अर्धशतक ठोकले होते. अशात शमीने 19व्या षटकात गोलंदाजी करून फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर आता शेवटचे षटक बाकी होते.
अखेरच्या षटकात पडल्या 4 विकेट्स
अनुभवी गोलंदाज मोहित शर्मा (Mohit Sharma) याच्या पहिल्या चेंडूवर राहुलने दोन धावा घेतल्या. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो सीमारेषेजवळ जयंत यादव याच्या हातून झेलबाद झाला. राहुल बाद होताच गुजरातने सामन्यात पुनरागमन केले. राहुलनंतर मार्कस स्टॉयनिस फलंदाजीला आला. त्याने यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो लाँग ऑनच्या दिशेने डेविड मिलर याच्या हातात गेला.
A monumental turnaround 🤯🤯@gujarat_titans clinch a narrow 7-run victory to get back to winning ways 🙌
Scorecard ▶️ https://t.co/TtAH2CiXVI#TATAIPL | #LSGvGT pic.twitter.com/1H6bd2yVdT
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
दोन चेंडूत दोन विकेट घेत मोहितसह संपूर्ण संघ आनंदी झाला. पुढच्याच चेंडूवर आयुष बदोनी दोन धावा घेण्याच्या नादात धावबाद झाला, तर पाचव्या चेंडूवर दीपक हुड्डा वृद्धिमान साहाकडून धावबाद झाला. शेवटच्या चेंडूवर मोहितने 4 धावा खर्च केल्या. अशाप्रकारे त्याने पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर धावा खर्च करत दुसऱ्या ते चौथ्या चेंडूवर संघाला विकेट मिळवून दिली. त्याने यादरम्यान 3 षटके गोलंदाजी करताना 17 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. तसेच, आपल्या संघाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. (ashish nehra message to hardik pandya gujarat titans won the match in mohit sharma last over lsg vs gt know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : विरोधी संघात असणाऱ्या आपल्या भावाला हार्दिककडून कडकडून मिठी, जर्सीही केली अदलाबदल
मुंबईच्या बालेकिल्ल्यात अर्शदीपचा राडा, 20व्या षटकात दोन चेंडूंवर मोडला धुरंधराचा स्टंप; पाहा व्हिडिओ