नागपूर कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात रविंद्र जडेजा याने भारतासाठी पाच विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन याने असी कामगिरी केली. दुसऱ्या डावात भारताला मिळालेल्या पहिल्या सहा विकेट्सपैकी पाच विकेट्स एकट्या अश्विनने घेतल्या. भारतीत परिणामी पाहुणा ऑस्ट्रेलियन संघ चांगलाच अडचणीत आला. दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्यानंतर अश्विनने काही खास विक्रम नावावर केले.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आहे. शनिवारी (11 फेब्रुवारी) त्याने पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ भक्कम स्थितीत आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएसन स्टेडियमवर खेळला जात असलेल्या या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया अवघ्या 177 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तर भारताने 400 धावा केल्या आणि 223 धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कसोटी सामन्याचा दुसरा डाव सुरू झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिय संघ पहिल्या डावापेक्षा अधिक अडचणीत असल्याचे पाहायला मिळाले. ऍलेक्स कॅरीची विकेट गमावल्यानंतर अश्विनने दुसऱ्या डावातील त्याच्या पाच विकेट्स पूर्ण केल्या.
अश्विनने भारतीय संघासाठी मायदेशात आतापर्यंत 52 कसोटी सामने खेळले आहेत. या 52 कसोटी सामन्यांमध्ये अश्विनने 25 वेळा पाच विकेट्स हॉल घेतला आहे. मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणाऱ्यां भारतीयांमध्ये अश्विन सर्वात आघाडीवर आहे. अश्विनप्रमाणेच माजी दिग्गज अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या नावावर देखील मायदेशात 25 वेळा कसोटी सामन्यात पाच विकेट्सची कामगिरी आहे. पण अश्विनने ही कामगिरी 52 कसोटी सामन्यांमध्ये केली आहे, तर कुंबळेंनी हा आकडा गाठण्यासाठी 63 कसोटी सामने खेळले आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग आहे. हरभजनने मायदेशात खेळलेल्या 55 कसोटी सामन्यांमध्ये 18 वेळा पाच विकेट्स हॉल घेतला आहे.
मायदेशात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारे भारतीय
25 – रविचंद्रन अश्विन (52 कसोटी सामने)*
25 – अनिल कुंबळे (63 कसोटी सामने)
18 – हरभजन सिंग (55 कसोटी सामने)
दरम्यान, भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स हॉल घेणाऱ्यांचा विचार केला, तर या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर 35 वेळा पाच विकेट्स घेणारे अनिल कुंबळे आहेत. अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 31 वेळा पाच विकेट्स हॉल घेतला असून यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील हरभजन सिंगने 25 वेळा ही कामगिरी केली आहे. 1983 विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. कपिल यांनी 23 वेळा पाच विकेट्स हॉल घेतला आहे.
भारतासाठी सर्वाधिक वेला पच विकेट्स हॉल घेणारे भारतीय
35 – अनिल कुंबळे
31 – रविचंद्रन अश्विन
25 – हरभजन सिंग
23 – कपिल देव
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारातने तिसर्याच दिवशी विजय मिळवला. अश्विनच्या फिरकी जबरदस्त फिरकी गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात अवघ्या 91 धावांवर गुंडाळला गेला आणि त्यांनी 132 धावांनी पराभव स्वीकारला. चार कसोटी सामन्यांच्या या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारतीय संघ या विजयानंतर 1-0 अशा आघाडीवर आहे. (Ashwin has 25 five-wicket haul from just 52 Tests in India )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीची आश्चर्यकारक आकडेवारी, कसोटीत ठोकलेत विराट आणि द्रविडपेक्षा जास्त षटकार
भारत वि. ऑस्ट्रेलिया : पहिल्या कसोटीत भारताचा शानदार विजय, पाहुण्या संघाची धुळधाण उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी