शुबमन गिल याला आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात गिल पूर्णपणे फ्लॉप ठरला. भारतीय सलामीवीराने पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 26 धावा केल्या होत्या. शुबमन गिल याच्या कसोटी आकडेवारीपेक्षा फिरकी अष्टपैलू खेळाडू आर आश्विन याची फलंदाजीची आकडेवारी चांगली आहे, यावर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु हे खरे आहे.
शुबमन गिल (Shubman Gill) याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत कसोटी सामन्यांच्या 35 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. पण गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या आर अश्विन (R Ashwin) याने कसोटीच्या पहिल्या 35 डावात गिलपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आतापर्यंतच्या कारकिर्दीत गिलने 19 सामन्यांच्या 35 डावांमध्ये 31.06 च्या सरासरीने 994 धावा केल्या आहेत. पण त्याचवेळी अश्विनने कसोटीच्या पहिल्या 35 डावात 1006 धावा केल्या होत्या. म्हणजेच 35 डावांनंतर अष्टपैलू अश्विनने सलामीवीर फलंदाज शुबमन गिलपेक्षा 12 धावा जास्त केल्या होत्या.
गिलने ज्या प्रकारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून स्वत:चे नाव कमावले आहे, त्याच पद्धतीने तो कसोटी क्रिकेटमध्येही आपला दर्जा राखू शकला नाही. आतापर्यंत कसोटीत गिलची बॅट शांत राहिली आहे. गिलने आतापर्यंत कसोटीत केवळ दोन शतके झळकावली आहेत, त्यापैकी एक भारताबाहेर आहे, जे त्याने बांगलादेशच्या भूमीवर केले आहे. म्हणजे मोठ्या देशांमध्ये कसोटी खेळताना गिलने एकही शतक झळकावलेले नाही.
गिलने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले, तेव्हापासून तो 19 लाल चेंडू सामने खेळला आहे. या सामन्यांच्या 35 डावांमध्ये त्याने 31.06 च्या सरासरीने 994 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 128 आहे. (Ashwin’s batting numbers in Tests are better than Gill you will also be shocked)
हेही वाचा
रिचा घोषची एकाकी झुंज अपयशी, अवघ्या तीन धावांच्या विजयासह मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात
पाच फलंदाज ज्यांनी 2023 गाजवलं, कुटल्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, भारतीयांचे वर्चस्व