---Advertisement---

सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर आली अश्विनची प्रतिक्रिया, ‘या’ व्यक्तीला दिले शतकाचे श्रेय

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 10:42 PM
---Advertisement---

चेन्नईच्या एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत नामुष्कीजनक पराभव पत्करल्यानंतर दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत पाहुण्या इंग्लंड संघाला पराभूत केले. यजमान भारताने दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. त्यानंतर, या सामन्यात सामनावीर ठरलेल्या रविचंद्रन अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अश्विनने केली चमकदार कामगिरी

चेन्नई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वोत्तम कामगिरी केली. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर गुंडाळताना अश्विनने इंग्लंडचे ५ गडी बाद केले होते. त्यानंतर, दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत, खराब झालेल्या खेळपट्टीवर १०६ धावांची लाजवाब खेळी केली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातही त्याने तीन बळी मिळवत भारताच्या विजयात हातभार लावला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

अश्विनची आली प्रतिक्रिया

सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला, “ही खेळपट्टी पहिल्या सामन्यापेक्षा खूप वेगळी होती. या खेळपट्टीवर जास्त वळण घेणाऱ्या चेंडूंवर बळी मिळत नव्हते. येथे फलंदाजांच्या मानसिकतेशी खेळून बळी मिळवता येत होते.”

चेन्नईत खेळण्याच्या आपल्या अनुभवाविषयी बोलताना अश्विनने सांगितले, “मी या मैदानावर अनेक वर्षांपासून खेळत आहे. त्याचा मला फायदा झाला. सकारात्मक राहून फलंदाजांवर दबाव आणणे, आमच्या फायद्याचे ठरले. मी याबाबतीत रोहित शर्मा व फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याशी चर्चा केली होती.”

विक्रम राठोड यांना दिले शतकाचे श्रेय

अश्विनने आपल्या फलंदाजीचे श्रेय प्रशिक्षक विक्रम राठोड यांना दिले. त्याविषयी, बोलताना तो म्हणाला, “मी राठोड यांना म्हटलो चेंडू खेळून काढण्यापेक्षा त्यावर धावा बनविणे गरजेचे आहे. पहिला चेंडू माझ्या बॅटच्या मधोमध लागल्यानंतर मी समजून गेलो की, मी या खेळपट्टीवर मोठ्या धावा बनवू शकतो. गोष्टी माझ्या बाजूने घडत नसताना मी प्रयत्न करत राहतो.”

अश्विनने आपल्या शतकी खेळीदरम्यान अनेक विक्रम आपल्या नावे केले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये त्याने प्रथमस्थान मिळवले आहे. तसेच, एकाच सामन्यात शतक आणि पाच बळी मिळवण्याची कामगिरी त्याने तिसऱ्यांदा केली. हे त्याच्या कारकिर्दीतील पाचवे शतक होते.

महत्त्वाच्या बातम्या –

नेटकरी जोमात, इंग्लंड कोमात! भारताच्या विजयानंतर चाहत्यांचा उत्साह, सोशल मिडीयावर मिम्सचा सुळसुळाट

अक्षर पटेलने गाजवले पदार्पण! तब्बल ४२ वर्षांनंतर ‘असा’ पराक्रम करणारा बनला दुसराच भारतीय

पराभवानंतरही रूटने असे भाष्य करत जिंकले भारतीय चाहत्यांचे मन; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---