---Advertisement---

चहलला काढा आणि ‘त्याला’ घ्या! माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

On: मंगळवार, सप्टेंबर 6, 2022 12:42 PM
Yuzvendra-Chahal
---Advertisement---

सध्या सुरू असलेल्या आशिया चषका स्पर्धेत भारताचा दिग्गज फिरकीपटू युझवेंद्र चहल काही खास कामगिरी करू शकला नाहीये. त्याने आशिया चषकातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये फक्त एक विकेट घेतली आहे आणि धावांवर देखील लगाम लावू शकला नाहीये. अशात भारताचा माजी दिग्गज गौतम गंभीर याने म्हटले आहे की, चहलच्या जागी आगामी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज आवेश खानला संधी दिली पाहिजे. तसेच युवा फिरकीपटू अर्शदीप सिंगला देखील संघात कायम ठेवले पाहिजे. 

भारताने सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करला आहे आणि संघाला पुढचा सामना मंगळवारी (6 सप्टेंबर) श्रीलंका संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी गौतम गंभीर  (Gautam Gambhir) म्हणाला की, “आवेश (Avesh Khan) चहलच्या (Yuzvendra Chahal) जागी संघात आला पाहिजे. रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) देखील नक्कीच संघात कायम ठेवले पाहिजे. त्याने या सामन्यात (पाकिस्तानविरुद्ध) सर्वकाही केले आहे. चहलने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केल्याचे दिसले नाही. त्यामुळेच शक्यतो आता बिश्नोईला संधी देण्याची वेळ आहे.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

‘तुला कळत नाही का**!’ फोटोखाली चुकीची कमेंट करणाऱ्याला संजना गणेशनने झापलं
कुटुंब अन् माजी क्रिकेटपटूंनी केली अर्शदीपची पाठराखण! म्हणाले, ‘हे सगळं…’
भारताविरुद्ध १९४ धावांची खेळी करणारा फलंदाज, मुलीच्या मृत्यूनंतर लागला होता धार्मिक प्रवचन द्यायला  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---