---Advertisement---

संपुर्ण यादी- असे आहेत एशिया कप २०१८ स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू

On: गुरूवार, सप्टेंबर 13, 2018 12:00 PM
---Advertisement---

एशिया कप 2018 च्या स्पर्धेसाठी आता दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व सहा संघांची तयारी सुरु झाली आहे. तसेच या स्पर्धेसाठी सर्व सहभागी संघानी काही दिवसांपूर्वीच संघाची घोषणा केली आहे.

ही द्विवार्षिक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये 15 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सलामीच्या सामन्याने दुबईत होईल.

एशिया कपच्या या स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ थेट पात्र ठरले आहेत. तर हाँग काँग हा संघ पात्रता फेरीची स्पर्धा जिंकून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

या स्पर्धेतील साखळी फेरीत अ गटातून भारत, पाकिस्तान आणि हाँग काँग हे संघ खेळतील, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.

दोन्ही संघातील प्रत्येकी अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर 28 सप्टेंबरला दुबईत या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल.

असे आहेत एशिया कप 2018 चे संघ:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल.

पाकिस्तान: सर्फराज अहमद (कर्णधार), फकार जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शान मसूद, शोएब मलिक, हरीस सोहेल, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, जुनैद खान, उस्मान खान, शाहीन अफ्रिदी, आसिफ अली , मोहम्मद अमीर.

हाँग काँग: अंशुमन रथ (कर्णधार), आयझ खान, बाबर हयात, कॅमेरॉन मॅकअल्सन, क्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाज, अरशद मोहम्मद, किनचिट शाह, नदीम अहमद, निजाकत खान, राघ कपूर, स्कॉट मॅकेकनी, तन्वीर अहमद, तन्वीर अफझल, वकास खान, आफताब हुसेन.

श्रीलंका: अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुसल परेरा, कुसल मेंडिस, उपुल थरंगा, दिनेश चंडिमल, दानुश्का गुनथिलका, थिसरा परेरा, दसुन शनका, धनंजय डि सिल्वा, अकिला धनंजया, दिलरुवन परेरा, अमिला अपोन्सो, कसून रजीथा, सुरंगा सकमल, दुश्मंथा चमिरा, लसिथ मलिंगा.

बांगलादेश: मशर्रफ मोर्ताझा (कर्णधार), शाकिब अल हसन, तमीम इक्बाल,  मोहम्मद मिथुन, लिटन दास, मुशफिकुर रहिम, अरिफुल हक, महमदुल्ला, मोसद्दीक हुसेन, मेहदी हसन, नाझमुल इस्लाम, रुबेल हुसेन, मुस्तफिजुर रहमान, अबू हैदर रोनी, नाझमुल हुसेन शान्तो, मोमिनुल हक.

अफगाणिस्तान: असघर अफगाण (कर्णधार), मोहम्मद शहझाद, इहसानुल्लाह जनत, जावेद अहमदी, रेहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी, गुल्बादिन नायाब, रशीद खान, नजीबुल्लाह झादरान, मुजीब उर रहमान, आफताब आलम, सामीउल्लाह शेनवारी, मुनीर अहमद, सईद शिरझाद, शारफुद्दीन अशरफ, यमीन अहमदझाई.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित शर्माला मिळाल्या युजवेंद्र चहलकडून बॅटींगच्या टिप्स

झुलन गोस्वामी ठरली सर्वात यशस्वी महिला गोलंदाज; मिताली राजचाही विश्वविक्रम

अॅलिस्टर कूकच्या कारकिर्दीचा शेवट गोड; जे सचिन, द्रविडलाही जमले नाही ते कूकने करुन दाखवले

कूक-पीटरसनमध्ये मैत्रीचे नवे पर्व?

पराभवानंतरही टीम इंडिया अव्वल स्थानी कायम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment