सध्या क्रिकेटविश्वात आशिया चषक स्पर्धेविषयी चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आशिया चषकाच्या इतिहासातील काही किस्सेही सांगितले जात आहे. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी १९८६ सालचा असाच एक खास किस्सा सांगितला आहे. त्यावेळी भारताविरुद्धच्या एका सामन्यात पाकिस्तानचे दोन खेळाडू अक्षरशः रडले होते.
वसीम आक्रम (Wasim Akram) याने सांगितलेला किस्सा चाहत्यांना पहिल्यांदाच समजला आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना खेळला जात होता. भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने होते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. तर दुसरीकडे भारताने उत्कृष्ट फलंदाजी करून २४५ धावांची खेळी केली. पाकिस्तानला या सामन्यात २४६ धावांची आवश्यकात होती. सामना अंतिम चेंडूपर्यंत खेळला गेला आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या चेंडूवर जेव्हा ४ धावांची आवश्यकता होती, तेव्हा पाकिस्तानच्या जाकिर खान (Zakir Khan) आणि मोहसिन कमाल (Mohsin Kamal) या दोन खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आले होते.
वसीम आक्रम हा किस्सा सांगताना म्हणाले की,”मला लक्षात आहे की, मी धावबाद झालो होतो. यादरम्यान एक वेगवान धाव घेतली आणि नंतर मियांदादने (जावेद) एक षटकार मारून पाकिस्तानला सामना जिंकवून दिला. मी देखील तेव्हा युवा खेळाडू होतो. माझ्यासोबत जाकिर खान मोहसिन खान हे दोन युवा खेळाडू होते, जे तेव्हा खेळत नव्हते. परंतु, तरीही न थांबता रडत होते. मी त्यांना म्हणालो की, ‘तुम्ही रडत का आहात?’ यावर त्यांनी उत्तर दिले की, आपल्याला हा सामना जिंकलायचा आहे.” आक्रमने सांगितलेल्या या किस्स्यावरून पाकिस्तानसाठी हा सामना किती महत्वाचा होता, याचा अंदाज येतो.
यावेळी भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) देखील यावेळी चर्चेत सहभागी होते. या सामन्याविषयी बोलताना कपिल म्हणाले की, “मला आजही वाटते की चेतनची (शर्मा) चूक नव्हती. शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या. मी त्याला म्हणालो होतो की, फुलटॉस टाकायचा म्हणजे टाकायचाच. त्याने प्रयत्न केला, पण यॉर्कर पडला. तो दिवस जावेदचा होता. त्याने पाय खाली ठेवला, चेंडू कनेक्ट केला आणि षटकार मारला. मला आजही तो क्षण आठवला, तर झोप येत नाही. या सामन्यानंतर संघाने पुढच्या चार वर्षातील आत्मविश्वास गमावला होता.”
दरम्यान, यावर्षीच्या आशिया चषक २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. भारताला त्याचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २८ ऑगस्ट रोजी खेळायचा आहे. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारत या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऑक्टोबरमध्ये पुन्हा आशिया कप! ‘हा’ देश भूषवणार यजमानपद
अखेर पंजाब किंग्सचा कुंबळेंना ‘थँक्यू व्हेरी मच’! मुख्य प्रशिक्षक म्हणून ‘ही’ नावे पुढे
आशिया चषकातील ‘हे’ विक्रम मोडणे नाहीये सोपे, सेहवागने केलाय गोलंदाजीत अजब कारनामा