---Advertisement---

INDvsPAK: पाकिस्तानचा सूड घेण्यास तयार आहेत भारत! आशिया चषकाच्या प्रोमोत दिसले रोहितचे रौद्ररूप

On: मंगळवार, ऑगस्ट 9, 2022 9:39 AM
Asia-Cup-Promo
---Advertisement---

क्रिकेटप्रेमींच्या नजरा सध्या आशिया चषक २०२२ वर लागून आहेत. २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने या मोहिमेची सुरुवात करेल. संपूर्ण क्रिकेटजगत उभय संघातील या घमासानाच्या प्रतिक्षेत आहे. तत्पूर्वी स्टार स्पोर्ट्सने या सामन्याचा प्रोमो चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. 

भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघातील या टी२० सामन्यासाठी सोमवारी (०८ ऑगस्ट) स्टार स्पोर्ट्सने प्रोमो (Asia Cup INDvsPAK Promo) जाहीर केला आहे. या प्रोमोच्या व्हिडिओत भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) दिसत आहेत.

पाकिस्तान संघाच्या आव्हानासाठी तयार आहे रोहित
प्रोमोच्या या व्हिडिओत रोहित फलंदाजी करताना दिसत आहे. रोहितचा आवाज बॅकग्राउंडला ऐकू येतो. याबरोबरच लोकांचा आवाजही मागे ऐकू येत आहे. रोहित म्हणतो की, ‘एक ओळ आमच्यात आहे, जी खेळपट्टीपर्यंत ओढलेली आहे’. पुढे पाकिस्तान संघाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय संघ सज्ज असल्याचे रोहितने म्हटले आहे.

तो म्हणतो की, ‘वर्षांनुवर्षे चालत आलेले नाते आहे आमचे.. क्रिकेटचे नाते.. त्या ओळीच्या पलीकडे.. खूप प्रतिभाशाली खेळाडू आहेत. आज या ओळीने पुन्हा आवाज दिला आहे. आणि आता भारताला आठव्यांदा आशिया चषक उंचवायचा आहे. पुन्हा जगात तिरंगा फडकवायचा आहे.’

तसेच व्हिडिओच्या शेवटी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिकी रनअप घेण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. तर रोहितही त्याचा सामना करण्यासाठी तयार दिसत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील टी२० विश्वचषक २०२१ मधील सामन्यात पाकिस्तानकडून आफ्रिदीने मॅच विनिंग प्रदर्शन केले होते.

आशिया चषक २०२२ चे वेळापत्रक:

पहिला सामना- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (२७ ऑगस्ट, दुबई)
दुसरा सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान (२८ ऑगस्ट, दुबई)
तिसरा सामना- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (३० ऑगस्ट, शारजाह)
चौथा सामना- भारत विरुद्ध क्वालिफायर (३१ ऑगस्ट, दुबई)
पाचवा सामना- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (१ सप्टेंबर, दुबई)
सहावा सामना- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर (२ सप्टेंबर, शारजाह)
सातवा सामना- बी१ विरुद्ध बी२, सुपर-४ (३ सप्टेंबर, शारजाह)
आठवा सामना- ए१ विरुद्ध ए२, सुपर-४ (४ सप्टेंबर, दुबई)
नववा सामना- ए१ विरुद्ध बी१, सुपर-४ (६ सप्टेंबर, दुबई)
दहावा सामना- ए२ विरुद्ध बी२, सुपर-४ (७ सप्टेंबर, दुबई)
अकरावा सामना- ए१ विरुद्ध बी२, सुपर-४ (८ सप्टेंबर, दुबई)
बारावा सामना- बी१ विरुद्ध ए२, सुपर-४ (९ सप्टेंबर, दुबई)
अंतिम सामना- पहिले सुपर-४ विरुद्ध दुसरे सुपर-४ (११ सप्टेंबर, दुबई)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsWI: शाही अंदाजात मेडल घ्यायला गेला कर्णधार रोहित, हार्दिकनेही ट्रॉफी घेताना जिंकली मने

बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारत-पाकिस्तानच्या संघांतील ‘तो’ सामना रद्द

भारतातील असे ३ क्रिकेट स्टेडियम; जिथे १० वर्षांपासून झाला नाही एकही सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---