एशिया कप (Asia Cup) २०२२ या स्पर्धेची चाहत्यांबरोबरच खेळाडूही आतुरतेने वाट पाहत आहेत. २७ ऑगस्टपासून सुरू होणारी ही स्पर्धा युनायटेड अरब अमिराती येथे खेळली जाणार आहे. यातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २८ ऑगस्टला खेळला जाणार आहे. यानंतर पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. सात सामन्यांची ही टी२० मालिका आगामी टी२० विश्वचषकासाठी महत्वाची आहे. असे असताना पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे एशिया कपला मुकला आहे. त्याबरोबरच तो इंग्लंंड विरुद्धच्या टी२० मालिकेतूनही संघाबाहेर झाला आहे.
सध्या पाकिस्तानचा संघ नेदरलॅंड्सच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत असून शाहीनचा संघात समावेश आहे. मात्र तो झालेल्या दोन्ही वनडे सामन्यात खेळला नाही. कर्णधार बाबर आझम याने नेदरलॅंड्सचा दौरा सुरू होण्याआधी शाहीनच्या दुखापतीबाबत मोठा खुलासा केला होता. त्याने म्हटले, शाहीनला नेदरलॅंड्सला नेले जाईल आणि तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जाईल. मात्र त्याच्या दुखापतीत काहीच सुधारणा न झाल्याने पाकिस्तान त्याच्याशिवाय दोन्ही सामने खेळला.
शाहीनच्या गुडघ्याचे स्कॅन करण्यात आले असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (पीसीबी) मेडीकल रिपोर्ट्सनुसार, त्याला डॉक्टरांनी ४-६ आठवड्यांचा आराम सांगितला आहे. यामुळेच तो आगामी दोन्ही मोठ्या मालिकांसाठी मुकला आहे.
“मी त्याच्याशी बोललो, तो हे रिपोट्सपासून खूपच निराश आहे. तर तो एक उत्तम खेळाडू असून लवकरच फिट होऊन संघात परतेल,” असे पीसीबीचे मेडिकल अधिकारी डॉ. नजीबुल्लाह सुम्रो म्हणाले आहेत.
BREAKING: Shaheen Afridi has been ruled out of the 2022 Asia Cup.
Details ⬇️
— ICC (@ICC) August 20, 2022
शाहीनने रोटरडॅम येथे रिहॅबिलिटेशन पूर्ण केले आहे. तेथे त्याच्यात थोडी सुधारणा दिसली होती, मात्र त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी अधिक वेळ हवा आहे.
शाहीनचा पाकिस्तान संघात समावेश असणार आहे. सध्यातरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने त्याच्याजागी कोणत्याही खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दु:खद! भारतीय फुटबॉलला ‘सुवर्ण युग’ दाखवणारा दिग्गज हरपला, ‘बद्रू दा’ यांचे निधन
क्षणात तोडलं हृदय! इंग्लंडचा शतकवीर दुर्देवीरित्या धावबाद, संघ सहकाऱ्यानेच उडवल्या दांड्या