अफगाणिस्तानचा संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. आतापर्यंत या मालिकेतील पहिले ३ सामने पार पडले असून यजमान आयर्लंड या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. येत्या आशिया चषक २०२२ च्या सरावाच्या दृष्टीने ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे. कारण आशिया चषक यंदा टी२० स्वरूपात खेळला जाणार आहे. परंतु २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी अफगाणिस्तानचा हुकुमी एक्का राशिद खान हा आऊट ऑफ फॉर्म झाला आहे. अफगाणिस्तान संघासाठी ही चिंताजनक बाब आहे.
राशिदला (Rashid Khan) टी२० क्रिकेटमधील दिग्गज गोलदाजांमध्ये गणले जाते. तो जगभरातील जवळपास सर्व टी२० लीगमध्ये सहभागी होतो. टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात ४५० पेक्षा जास्त विकेट्स आहेत. परंतु टी२० स्वरूपात होणाऱ्या आशिया चषकाच्या येत्या हंगामापूर्वीच त्याची लय बिघडली आहे. त्याला आयर्लंड संघाविरुद्ध (Ireland vs Afghanistan) टी२० मालिकेत आतापर्यंत एकही विकेट घेता आली नाही.
आयर्लंडविरुद्धच्या चालू टी२० मालिकेतील (T20I Series) पहिल्या ३ सामन्यांमध्ये त्याला आतापर्यंत एकही विकेट घेता आलेली नाही. २३ वर्षीय राशिदने पहिल्या सामन्यात २५ धावा खर्च केल्या. तर दुसऱ्या टी२० सामन्यात २७ धावा दिल्या होत्या. तर तिसऱ्या टी२० सामन्यात त्याने ३८ धावा खर्च केल्या आहेत. परंतु त्याला या तिनही टी२० सामन्यांमध्ये विकेट मिळालेली नाही. अगदी त्याचे फलंदाजीतील प्रदर्शनही खराब राहिले आहे. त्याने अनुक्रमे २, ९ आणि शून्य धावा केल्या आहेत.
अफगाणिस्तान संघासाठी ही चिंताजनक बाब आहे. आशिया चषकात (Asia Cup 2022) अफगाणिस्तानचा संघ बांगलादेश आणि श्रीलंका संघासोबत गट ब चा भाग आहे. परंतु या ३ पैकी दोनच संघ सुपर-४ टप्प्यात प्रवेश करतील. अशात राशिदसारख्या मातब्बर गोलंदाजाने फॉर्मात नसणे अफगाणिस्तान संघासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेची मालकी असलेल्या ‘या’ संघाचा मेंटॉर नाही बनू शकणार धोनी, बीसीसीआय ठरलीय कारण
भारतीय खेळाडूचा टी२० लीगमध्ये शतकी तडाखा, अजून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पणही नाही झाले






