भारत विरुद्ध पाकिस्तान, या हाय व्होल्टेज सामन्यामुळे आशिया चषक २०२२ चर्चित आहे. या स्पर्धेची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार असून ११ सप्टेंबर रोजी अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय संघ आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. ७ वेळा आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाकडून यंदाही भरपूर अपेक्षा आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही या सामन्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते कोलकात्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
ऑक्टोबर २४, २०२१ ला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघात शेवटचा सामना झाला होता. टी२० विश्वचषकातील या सामन्यात पाकिस्तानने १३ चेंडू शिल्लक असताना १० विकेट्सने विजय मिळवला होता. यानंतर आता जवळपास ९ महिन्यांनी उभय संघ एकमेकांशी भिडणार आहेत. अशात भारतीय संघाकडे या पराभवाचा वचपा काढण्याची संधी असेल.
या सामन्याविषयी बोलताना माजी भारतीय कर्णधार गांगुली (Sourav Ganguly On IndvsPak) म्हणाले की, “भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना फक्त एक सामना आहे. इतर सामन्यांप्रमाणेच हा सामनाही आहे. जेव्हा मी पाकिस्तानविरुद्ध खेळत असायचो, तेव्हा मी याला सामन्याला विशेष मानायचो नाही. हा, बादफेरी सामन्यांमध्ये मात्र जास्त दबाव असायचा. परंतु रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल सर्व अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे की, दबाव कसा झेलायचा असतो. त्यांच्यासाठी ही जास्त मोठी गोष्ट नाही.”
याबरोबरच गांगुलीने (Sourav Ganguly Favourite T20 Team) टी२० क्रिकेटमधील आपला आवडता संघही सांगितला आहे. आपल्या आवडत्या टी२० सामन्याबद्दल बोलताना गांगुली म्हणाले की, “टी२० क्रिकेटमध्ये माझा कोणताही आवडता संघ नाही. प्रत्येकजण चांगला आहे. जो चांगला खेळेल, तोच जिंकेल.”
तसेच भारतीय संघ टी२० विश्वचषक २०२२ मध्ये चांगले प्रदर्शन करेल, असा विश्वासही गांगुलींनी व्यक्त केला आहे. भारत एक चांगला संघ आहे. ते खूप चांगले खेळत आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सामने जिंकले आहेत. तसेच त्यांनी वेस्ट इंडिजमध्येही विजय नोंदवला आहे. मला अपेक्षा आहे की, आगामी टी२० विश्वचषकात भारतीय संघ चांगला खेळेल, असे गांगुली म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
जिंकलस! ‘लोखंडी भिंत’ही नाही रोखू शकली रोहितचं चाहत्यांवरील प्रेम, पाकिस्तानी फॅनला मारली मिठी
जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक
भारताची प्लेइंग इलेव्हन ‘फुटली’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी बीसीसीआयने जाहीर केलाय संघ?