आशिया चषक (Asia Cup) 2022मध्ये दुसऱ्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारी (4 सप्टेंबर) समोरासमोर येत आहेत. सुपर फोरचा दुसरा सामना भारत-पाकिस्तान यांच्यात दुबई येथे खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत भारत विजयाची मालिका कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल तर पाकिस्तान मागील पराभवाचा बदला घेण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. त्यासाठी पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रऊफ याने काही रणनीतीही आखल्या आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) हा सामना नेहमीच हायव्होल्टेजचा असतो. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ कठोर मेहनत घेतात. तर भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा यावर्षी चांगलाच फॉर्ममध्ये आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठीचा सामनाविजयी खेळाडू ठरत आहे. त्याने याचवर्षी इंग्लंडच्या दौऱ्यात टी20 मालिकेत शतक केले आहे. तसेच त्याने 14 टी20 सामन्यात 514 धावा केल्या आहेत. त्याला कसे बाद करावे यासाठी विरोधी संघ योजना आखत असतात. तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफ (Haris Rauf) यानेही रणनीती सांगितली आहे.
“तुम्ही जेव्हा फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला गोलंदाजी करता तेव्हा त्या गोलंदाजाची सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो. यामुळे तो फलंदाज दबावात येईल आणि चुक करेल. त्याचाच फायदा घेत विकेट काढणे सोपे जाईल,” असे हॅरीसने म्हटले आहे.
सध्या दुबईच्या खेळपट्टीवर स्पिनला फायदा होत नसून वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत विकेट्सही काढत आहेत. हॅरीसने म्हटले, “हार्दिक पंड्या आणि बाकी भारतीय फलंदाजांना बाद करण्याचा नाही तर अधिकाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा हेतू आहे. फलंदाज जेव्हा धावा करत नाही तेव्हा त्याची विकेट मिळते.”
28 ऑगस्टला झालेला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान सर्वाधिक दबावात्मक ठरला. तर भारताच्या संघातून अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्याजागी अक्षर पटेल संघात परतला आहे. भारतामध्ये झालेल्या या बदलाबद्दलही हॅरीस म्हणाला, “जडेजाची अनुपस्थिती संघासाठी अधिक नुकसानदायक ठरणार नाही. आम्ही भारताविरुद्ध अधिक आत्मविश्वासाने सामना खेळला होता आणि आताही त्याच आत्मविश्वासाने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.”
क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. प्रत्येक वेळी बाबर आजम याच्यावरत अवलंबून राहणे योग्य नाही, असे मतही हॅरीसने मांडले आहे. “बाबर हा एक उत्तम खेळाडू आहे. तो फक्त एक फलंदाज नसून कर्णधार आहे. त्याला माहित आहे पुढच्या सामन्यात कसा खेळ करायचा आणि तो चांगला खेळेल अशी आशा आहे, असेही हॅरिसने म्हटले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकातील हाराकिरी जिव्हारी! बांगलादेशच्या स्टार यष्टीरक्षकाचा टी20 क्रिकेटला अलविदा
INDvsPAK: भारताला आणखी एक धक्का, खुद्द द्रविडने सांगितलेय; प्लेइंग इलेव्हनबद्दलही दिलेत संकेत
गावसकरांनी ४३८ धावांचे लक्ष्य जवळपास गाठून दिले होते, पण….