एशिया कप (Asia Cup)२०२२च्या स्पर्धेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हॉंगकॉंग हे संघ निश्चित झाले आहेत. सध्या या सर्व संघाचे खेळाडू युनायटेड अरब अमिरातीमध्ये (यूएई) असून त्यांचा सराव सुरू आहे. २७ ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. तर या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना २८ ऑगस्टला दुबई येथे खेळला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांनी नेटमध्ये कसून सराव केला आहे. खेळाडू सराव करते होते येथेही भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या चाहत्यांची गर्दी दिसली. त्यातच विराटने केलेल्या एका कृतीने चाहत्यांचे मनही जिंकले असून त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याचे चाहते जगभरात आहे. त्यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे. कारण पाकिस्तानचे काही चाहते यूएईमध्ये फक्त एशिया कप पाहण्यासाठी नाही तर विराटची भेट व्हावी यासाठी आले आहेत. अशातच पाकिस्तानच्या एका अपंग चाहतीने त्याची भेट घेण्यासाठी खूप दूरवरून येत विराटला भेटण्याची इच्छा दर्शवली आणि त्यानेही ती पूर्ण केली आहे.
.@imVkohli clicked a selfie with a handicapped fan #AsiaCup2022 #PAKvsIND #ViratKohli𓃵 pic.twitter.com/N27KB3nxmB
— muzamilasif (@muzamilasif4) August 26, 2022
एशिया कपच्या तयारीमध्ये व्यस्त असणाऱ्या विराटने सरावानंतर चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढल्या आहेत. पाकटिव्ही डॉट टीव्हीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर विराटने त्या अपंग चाहतीसोबत घेतलेल्या भेटीचा व्हिडिओ शेयर केला आहे. त्या अपंग मुलीने विराटची भेट घेण्याअगोदर चॅनलशी बोलताना म्हटले, ‘विराटला भेटण्यासाठी मी खूप लांबून आली आहे.’ तर विराटची भेट झाल्यावरही तिने आपले विचार व्यक्त करताना म्हटले, ‘विराटला मला माझे हालचाल विचारले आणि मला भेटून आनंद झाला असेही म्हटले.’
हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही दिसेल पाकिस्तानमध्येही विराटचा मोठा चाहतावर्ग आहे. पाकिस्तान विरुद्ध खेळताना विराटचा तो १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना असणार आहे. तो दोन महिन्याच्या मोठ्या विश्रांतीनंतर मैदानात परतत आहे. त्याने नेटमध्ये सराव करताना मोठे शॉट्स खेळताना तो या स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे हे दाखवून दिले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईचे क्रीडापटू मयूर व्यास यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या ‘लाइफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स’ ने गौरव
दुलीप ट्रॉफीसाठी सज्ज पूर्व विभाग; क्रिडामंत्री कर्णधार तर आयपीएल गाजवणारे साथीदार
थांबायचं नाय गड्या! नेट्समध्ये सोडा विराट कोहली दुबईच्या रस्त्यांवरही करतोय बॅटिंगची प्रॅक्टिस