---Advertisement---

सुपर-4मध्ये पोहोचल्यानंतर दुबईच्या बीचवर भारतीय संघाची मस्ती, विराटच्या सिक्स पॅक्सवर चाहते फिदा

On: शुक्रवार, सप्टेंबर 2, 2022 4:06 PM
Virat Kohli Six pack
---Advertisement---

आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवून सुपर फोर फेरीत जागा पक्की केली आहे. सुपर फोर फेरीत भारताला त्यांचा पुढचा सामना रविवारी (4 सप्टेंबर) रोजी खेळायचा आहे. या सामन्यात भारतापुढे पाकिस्तानचे आव्हान असेल, अशी शक्यता आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचे दिग्गज दुबईतील बीचवर एन्जॉय करताना दिसले. याप्रसंगी विराट कोहली याचे सिक्स पॅक्स पाहून सर्वजण खुश झाले आहेत. 

विराट कोहली बनलाय अधिक मस्कुलर – 
भारतीय संघाने गुरुवारी (1 सप्टेंबर) दुबईमध्ये निवांत वेळ घालवला. सर्व खेळाडू बीचवर सर्फिंग आणि कयाकिंग केली. यादरम्यान खेळाडूंनी रेतीमध्ये वॉलीबॉल देखील खेळला. विराट कोहली (Virat Kohli) पांढऱ्या रंगाची शॉर्ट घालून बीचवर आला होता. त्याचे सिक्स पॅक्स पाहून बीचवर उपस्थित प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. त्याची शरीर आधिपेक्षा जास्त मस्कुलर दिसत होते.

दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कायकिंग केली. रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल हेदेखील त्यांच्या अंदाजात मजा घेताना दिसले. युझवेंद्र चहल बीसीसीआय टीव्हीवर चर्चा करत असताना म्हणाला की, “असा प्रकारचे सेशन संघातील खेळाडूंना एकमेकांच्या अधिक जवळ आणतात.” बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले आहे.

दरम्यान आशिया चषकातील भारताच्या प्रदर्शनचा विचार केला, तर ते अप्रतिम राहिले आहेत. भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग हे संघ ‘ग्रुप ए’ मध्ये आहेत. पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला 5 विकेट्स राखून पराभूत केले होते. भूवनेश्वर कुमारने या सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. तर हार्दिक पंड्याने 3 विकेट्ससह फलंदाजीत देखील महत्वाचे योगदान दिले होते. हाँगकाँगविरुद्ध खेळताना भारताने 40 धावांच्या मोठ्या अंतराने विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने या सामन्यात अवघ्या 26 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली होती. या दोन सामन्यांतील प्रदर्शन पाहता भारताला आशिया चषकात विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार म्हटले जात आहे. तत्पूर्वी मागचे दोन आशिया चषक देखील भारतानेच जिंकले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

‘संघात निवड झाली अन् वडिलांच्या कबरीवर पोहोचला’, पाकिस्तानी खेळाडूने केलं भावूक कृत्य
केएल राहुलला हटवून ‘या’ खेळाडूंना केले जाऊ शकते उपकर्णधार, टी20 संघातूनही होणार बाहेर?
बांगलादेशला सळो की पळो करणाऱ्या कुसल मेंडिसचा खास ‘ऍक्शन प्लॅन’! स्वत: केलायं खुलासा  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---