आगामी आशिया चषकचे यजमानपद श्रीलंकन संघ भूषवणार होता. परंतु श्रीलंकेतील सध्याची आर्थिक आणि राजकीय संकटे पाहता ही स्पर्धा त्याठिकाणी खेळवणे शक्य दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी (२१ जुलै) मोठी घोषणा केली. गांगुलींनी दिलेल्या माहितीनुसार आगामी आशिया चषक हा संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएईत खेळवला जाईल.
गुरुवारी बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीतच आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) च्या आयोजनाविषयी चर्चा झाल्याचे समजते. बैठक संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना सौरब गांगुली (Sourav Ganguly) यांनी ही माहिती दिली. माध्यमांशी बोलताना गांगुली म्हणाले की, “आशिया चषक संयुक्त अरब अमीरातमध्ये (UAE) होईल. कारण ही अशी जागा आहे, जिथे पाऊस पडू शकत नाही.”
माध्यमांतील वृत्तानुसार श्रीलंका क्रिकेट बोर्डने बुधवारी (२० जुलै) आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) सूचित केले आहे की, त्यांच्या देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आशिया चषकाच्या आगामी हंगामाचे आयोजन करण्याच्या परिस्थितीत नाहीये. देशातील या परिस्थितीमुळेच श्रीलंका क्रिकेटने लंका प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाचेही आयोजन केले नाहीये. यावर्षी लंका प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम खेळवला जाणार होता. आशिया चषकाचे आयोजन २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत केले जाईल.
यापूर्वी एसीसीच्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, “श्रीलंका क्रिकेटने सूचित केले आहे की, त्यांच्या देशातील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीच्या कारणास्त, खास करून परकीय चलनाचा प्रश्न आहे. अशात त्यांच्या देशात सहा संघांच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी ही योग्य वेळ नाहीये.” असेही समजते की, श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या अधिकाऱ्यांनी ही स्पर्धा यूएईत खेळवली जावी, असा सल्ला दिला.
आशिया चषक सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांची कालावधी राहिला आहे. अशात एसीसीकडून लवकरच स्पर्धा यूएईत खेळवली जाणार आहे, अशी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. आशिया चषक संपल्यानंतर आगामी काळात संघांला आयसीसी टी-२० विश्वचषक खेळायचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघ यजमानपदासाठी सज्ज! टी२० विश्वचषकापूर्वी कांगारू आणि दक्षिण आफ्रिका येणार भारत दौऱ्यावर
INDvWI। पहिल्या सामन्यातून उपकर्णधारच बाहेर, वाचा कोण घेणार संघात जडेजाची जागा?
तर ठरलं! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘या’ दोन महत्त्वाच्या स्पर्धांची वापसी; या तारखांना होणार सुरुवात