आशिया चषकात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अक्षरशः कहर केला आहे. बुधवारी (6 सप्टेंबर) सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात देखील पाकिस्तान संघातील गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. समोर असलेला बांगलादेश संघ 38.4 षटकात 193 धावा करून सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी कर्णधार शाकिब अल हसन याने 53, तर यष्टीरक फलंदाज मुशफिकूर रहीम याने 64 धावांची खेळी सर्वोत्तम खेळी केली. पाकिस्तानसाठी हॅरिस रौफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण त्यांच्या भक्कम गोलंदाजी आक्रमाणाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा घाम काढला. हॅरिस रौफ याने 6 षटकात 19 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. तसेच नसीम शाह याने 5.4 षठकात 34 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. शाहीन शाह आफ्रिदी, फहीन अश्रफ आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. दुसरीकडे बांगलादेशसाठी शाकिब अल हसन आणि मुशफिकूर रहीम यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. (Asia Cup 2023 । PAK vs BAN, Bangladesh bowled out for just 193. Rauf picked 4, Naseem picked 3 )
पाकिस्तान विरुद्ध बांगलादे सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन –
पाकिस्तान – फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ.
बांगलादेश संघ
मोहम्मद नईम, मेहिदी हसन मिराझ, लिटन दास, तौहिद हृदोय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, अफिफ हुसैन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार रोहितचा आशिया चषकमध्ये खास रेकॉर्ड, चाहत्यांना जेतेपद पटकवण्याची अपेक्षा
रोहित बनला वर्ल्डकप खेळणारा भारताचा 8वा कर्णधार, ‘ही’ आहेत इतर 7 नावे