आपण आजपर्यंत अनेक भारतीय कर्णधारांचे पत्रकार परिषदांमधील व्हिडिओ पाहिले आहेत. मात्र, या सर्वांमध्ये रोहित शर्माची पत्रकार परिषद नेहमीच चर्चेचा विषय ठरते. रविवारी (दि. 17 सप्टेंबर) भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा 10 विकेट्सने पराभव केला. यानंतर रोहितचा आनंद गगनात मावेनासा झाला. भारताच्या या धमाकेदार प्रदर्शनानंतर फटाक्यांची आतिषबाजी झाली. ज्यावेळी पत्रकार परिषदेत रोहित आरामात बसला होता, तेव्हा बाहेरून फटाक्यांचा आवाज येऊ लागला. आता यावर रोहितची प्रतिक्रिया लक्ष वेधत आहे.
काय म्हणाला रोहित?
रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्रकार परिषदेदरम्यान आरामात बसला होता, तेव्हा फटाक्यांच्या आवाजाने त्याचे लक्ष वेधले. यावेळी तो अचानक बोलला, “अरे! विश्वचषक जिंकल्यानंतर फोडा यार.” रोहितने असे म्हणताच, पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. रोहितने यादरम्यान भारतीय संघाच्या शानदार प्रदर्शनाविषयी भाष्य केले.
Rohit Sharma heard crackers bursting outside during the Press Conference.
Rohit said, "burst the crackers after we win the World Cup (smiles)". pic.twitter.com/55Tk2amgK0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2023
‘तो मानसिकरीत्या तयार’
रोहितने अखेरच्या क्षणी केएल राहुल (KL Rahul) याला पाकिस्तानविरुद्ध सामील करण्याच्या प्रश्नावरही भाष्य केले. तो म्हणाला, “जेव्हा तुम्हाला अशाप्रकारे पुनरागमन करायचे असते, तेव्हा हे खूपच कठीण होते. नाणेफेकीच्या पाच मिनिटांपूर्वी आम्ही त्याला सांगितले की, तो आज खेळत आहे. मात्र, अशाप्रकारे शतक करणे त्या खेळाडूची गुणवत्ता दर्शवते की, तो मानसिकरीत्या यासाठी किती तयार आहे. खेळाडूंनी मोठ्या सामन्यांमध्ये आणि दबावाच्या स्थितीत उभे राहावे, असे आम्हाला वाटते.”
A sensational bowling performance, a comprehensive win and the #AsiaCup2023 title triumph 🏆
Recap #TeamIndia's memorable Sunday in Colombo 📽️🔽#INDvSL pic.twitter.com/Eym1a66jiX
— BCCI (@BCCI) September 17, 2023
यादरम्यान मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याच्या घातक गोलंदाजीविषयी बोलताना रोहित म्हणाला की, त्याला तोपर्यंत गोलंदाजी करू वाटत होते, जोपर्यंत ट्रेनरने त्याला संदेश पाठवला नाही.
ट्रेनरने पाठवला होता संदेश
रोहित म्हणाला, “मी खेळपट्टीकडे स्लीपवरून पाहून हैराण होतो. प्रत्येक दिवशी प्रत्येकजण असे करू शकत नाही. हिरो बना, तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन हिरो मिळतील. आज सिराजचा दिवस होता. त्याने 7 षटके टाकली, जी खूपच आहेत. मला त्याच्याकडून गोलंदाजी टाकून घ्यायची होती, पण मला आमच्या ट्रेनरकडून संदेश मिळाला की, आपल्याला त्याला थांबवण्याची गरज आहे. मला खात्री करून घ्यायची आहे की, सर्व थोडे शांत राहा आणि तुम्ही अतिशयोक्ती करत नाहीत.”
रोहित विश्वचषकापूर्वी आव्हानात्मक खेळपट्ट्यांचा सामना करून खुश आहे. त्याच्या मते, आशिया चषकातील खेळपट्टीमुळे विश्वचषकासाठी चांगली तयारी होईल. (asia cup 2023 ind vs sl world cup jeetne ke baad phodo yaar skipper rohit sharma make fun in press conference over firecrackers sound)
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराटसह ‘या’ भारतीय खेळाडूंच्या बायोपिकसाठी तमन्नाने निवडले साऊथ सुपरस्टार्स, पाहा यादी
‘गजिनी’ रोहित! बसमध्ये बसताना कॅप्टन हॉटेलमध्येच विसरला ‘ही’ महत्त्वाची गोष्ट, सहकाऱ्यांनी घेतली मजा- Video