आशिया चषक 2023 मध्ये सहयजमान पाकिस्तान व नेपाळ यांच्यात पहिला सामना खेळला गेला. मुलतान येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळवर अक्षरशः वर्चस्व गाजवले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचे दीड शतक तर इफ्तिखार अहमद याचे नाबाद तुफानी शतक याच्या जोरावर पाकिस्तानने 342 धावा उभ्या केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत नेपाळचा 104 धावांवर संपवत, 238 धावांनी विक्रमी विजय साजरा केला. शादाब खान याने पाकिस्तानसाठी सर्वाधिक चार बळी मिळवले.
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फखर झमान (14) आणि इमाम उल हक (5) स्वस्तात बाद झाले. कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या दोन विकेट्सनंतर पाकिस्तानचा डाव सांभाळला. रिझवान 50 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला आगा सलमान हादेखील अवघ्या 5 धावा करून बाद झाला. बाबर आझम याने 131 चेंडूत 151 धावा केल्या. त्याचसोबत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इफ्तिखार अहमद याने 71 चेंडूत 109 धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने 342 धावा उभ्या केल्या.
या धावांचा पाठलाग करताना नेपाळला पहिल्या षटकात दोन धक्के दिले. तर त्यानंतर नसीम शहा याने दुसऱ्या षटकात तिसरा गडी बाद केला. त्यानंतर नेपाळचे इतर फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. उपकर्णधार व फिरकीपटू शादाब खान याने चार गडी बाद करत नेपाळचा डाव अवघ्या 104 धावांमध्ये गुंडाळला. बाबर आझम याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
(Asia Cup 2023 Pakistan Beat Nepal By 238 Runs Babar Iftikhar Hits Century And Shadab Took Four Fer)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! बाबर आझमकडून आशिया चषकाची वादळी सुरुवात, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
महिला क्रिकेटसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! पुरुष आणि महिला खेळाडूंना एकसमान मॅच फी