आशिया चषक 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. यजमान संघ या स्पर्धेत पूर्ण आत्मविश्वासाने खेळत आहे. विशेष म्हणजे आपला सामना खेळला जाणार त्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन घोषित केली जात आहे. रविवारी (10 सप्टेंबर) भारतीय संघ सुपर फोरणधील आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी शनिवारी (9 सप्टेंबर) पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन घोषित केली गेली.
पाकिस्तान संघाने शनिवारी सायंकाळी भारताविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन घोषित केली. यामध्ये एक बदल प्रामुख्याने जाणवला. हा बदल म्हणजे मोहम्मद नवाज याच्या जागी फहिम अश्रफ याला घेतले गेले आहे. मोहम्मद नवाजने भारताविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये 55 धावा खर्च केल्या होत्या आणि एकही विकेट घेतली नव्हती. परिणामी त्याला बांगलादेश आणि आता पुन्हा एकदा भारताविरुद्ध खेळताना प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवले गेले.
सुपर फोरमध्ये प्रत्येक संघाला प्रत्येकी तीन-तीन सामने खेळायचे आहेत. पाकिस्तानने सुपर फोरमधील आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध जिंकला आहे. अशात भारताविरुद्ध जर दुसरा सुपर फोर सामना संघाला जिंकता आला, तर अंतिम सामन्यासाठीचा त्यांचा मार्ग अधिक सोपा होईल. दुसरीकडे भारतीय संघासाठी सुपर फोरमधील पहिलाच सामना रविवारी पाकिस्तानसोबत आहे. भारत कट्टर प्रतिस्पर्धक संघाला मात देण्यासाठी सर्व प्रयत्न करेल. पण पाकिस्तान देखील सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अशात उभय संघांतील ही लढत पाहण्यासारखी असेल. दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होईल.
Our playing XI for the #PAKvIND match 🇵🇰#AsiaCup2023 pic.twitter.com/K25PXbLnYe
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 9, 2023
तत्पूर्वी ग्रुप स्टेजमध्येही भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते. पण पावसामुळे या दोन्ही संघांमधील ही लढत निकाली होऊ शकली नाही. हा सामना अर्ध्यातून रद्द करावा लागला होता. रविवारी देखील कोलंबोमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. पण चाहते आणि खेळाडू पाऊस येणार नाही, या एका आशेवर आहेत. (Asia Cup 2023 Pakistan’s playing XI against India:)
सुपर फोरमध्ये भारताविरुद्ध या प्लेइंग इलेव्हनसह खेळणार पाकिस्तान संघ –
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
वनडेत वॉर्नरकडून मैलाचा दगड पार! आफ्रिकन गोलंदाजांना चोपत बनवला नवा विक्रम
वॉर्नरचा द. आफ्रिकेला शतकी तडाखा! सचिनला पछाडत बनला नंबर वन