आशिया चषक 2023 स्पर्धेतील वाद थांबायचे नाव घेत नाहीये. सुरुवातीला आयोजनावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर आता सुपर-4 फेरीतील फक्त भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवल्याने वादाला सुरुवात झाली आहे. फक्त भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ठेवलेल्या राखीव दिवसावर श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट संघांच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेतला होता. तसेच, त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या या निर्णयाचीही टीका केली आहे. त्यानंतर आता दोन्ही संघांच्या क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत या निर्णयाच्या बाजूने मत मांडले. मात्र, भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाला हा निर्णय आवडला नाही. त्याने ट्वीट करत राग व्यक्त केला.
काय म्हणाला वेंकटेश प्रसाद?
वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने ट्वीट (X) करत लिहिले, “हे सत्य असेल, तर हा पूर्णपणे निर्लज्जपणा आहे. आयोजकांनी थट्टा उडवली आहे आणि इतर दोन संघांसाठी वेगवेगळ्या नियमांसोबत स्पर्धा आयोजित करणे अनैतिक आहे. अशात न्याय तेव्हाच होईल, जेव्हा पहिल्या दिवशी सामना होऊ शकला नाही आणि राखीव दिवशीही जोरात पाऊस आला तसेच, दुर्दैवाने योजना अयशश्वी ठरेल.”
If true this is absolute shamelessness this. The organisers have made a mockery and it is unethical to have a tournament with rules being different for the other two teams.
In the name of justice, will only be fair if it is abandoned the first day, may it rain harder on the… https://t.co/GPQGmdo1Zx— Venkatesh Prasad (@venkateshprasad) September 8, 2023
बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बरसला प्रसाद
प्रसाद एवढ्यावरच थांबला नाही. त्याने या निर्णयासाठी होकार देणाऱ्या बांगलादेश आणि क्रिकेट बोर्डावरही आगपाखड केली. त्याने ट्वीट करत विचारले, “जेव्हा तुम्हाला स्वत:च्या सामन्यांसाठी राखीव दिवस मिळत नाहीये, तर या चुकीच्या मागणीवर सहमत होण्याचा कसला दबाव होता? यामुळे तुमच्या संघाला क्वालिफाय करण्याची संधी गमवावी लागली, तरी भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाने पाणी फेरू नये, यासाठी एवढी उदारता का बाळगावी? असे करण्यामागील नेमका हेतू आणि कारण सांगू शकाल का?”
What was the pressure to agree on this unreasonable demand, when you aren’t getting a reserve day for your own matches ? Why so much generosity to ensure India vs Pakistan isn’t washed out even if it costs your own team a chance to qualify. Can you please explain truly the… https://t.co/gPE6H3Fjfd
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) September 8, 2023
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा यू-टर्न
खरं तर, या प्रकरणी आधी बांगलादेश आणि श्रीलंका संघांच्या प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी यावर यू-टर्न घेतला. बांगलादेश बोर्डाने ट्वीट केले की, “आशिया चषकाच्या सुपर- 4 फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता पाहता राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे खेळण्याच्या अटींमध्ये बदल झाला आहे. याबाबत आम्ही स्पष्ट करतो की, हा निर्णय चारही संघ आणि एसीसीच्या संमतीने घेतला गेला आहे.”
A reserve day for India Pakistan contest in Super 11 Asia Cup Super 4 stage has been added that effectively revised the Asia Cup playing condition. To clarify on the position, the decision was taken with the consent of all four participating teams and ACC.
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 8, 2023
The reserve day for the India-Pakistan contest of the Super 11 Asia Cup Super 4 stage was taken in consultation with all four member boards of the Super 4 competing teams.
Accordingly, the ACC effectively revised the playing conditions of the tournament to effect the agreed-upon…
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 8, 2023
श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही आपल्या ट्वीटमध्ये असेच लिहिले आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात (दि. 10 सप्टेंबर) रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर सामना खेळला जाणार आहे. या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (asia cup 2023 venkatesh prasad targets jay shah led acc decision to add reserve day for india vs pakistan super 4 match must read)
हेही वाचाच-
आशिया चषक 2023 संपताच दुसऱ्यांदा लग्न करणार शाहीन आफ्रिदी, कारण घ्या जाणून
न्यूझीलंडचा इंग्लंडला दे धक्का! कॉनवे-मिचेलच्या नाबाद शतकांनी पार केला 292 धावांचा पहाड