जेव्हाही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असतो, तेव्हा संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष या सामन्याकडे लागलेले असते. अशात आशिया चषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना या दोन संघात श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी उत्साहित आहेत. मागील 4 वर्षांनंतर उभय संघात वनडे सामना खेळला जाणार आहे. अशात या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याची भेट घेतली. यादरम्यानचा व्हिडिओ सर्वांच लक्ष वेधत आहे.
विराट कोहली आणि हॅरिस रौफ भेट
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट कोहली आणि हॅरिस रौफ (Virat Kohli And Haris Rauf) एकमेकांना मिठी मारताना दिसले. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत हॅरिस म्हणताना दिसत आहे की, “जिथूनही जातो, सर्वत्र कोहली-कोहली होत आहे.” यानंतर विराट म्हणतो की, “बॉडी ठीक आहे. इतक्या मोठ्या स्पर्धा येत आहेत.” या व्हिडिओत पुढे रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि सलामीवीर इमाम उल हक (Imam Ul Haq) यांना भेटताना दिसत आहे.
Pakistan and India players meet up ahead of Saturday's #PAKvIND match in Kandy ✨#AsiaCup2023 pic.twitter.com/iP94wjsX6G
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 1, 2023
टी20 विश्वचषक 2022मध्ये मारलेले दोन षटकार
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध धावांचा पाऊस पाडला होता. त्याने सामन्यात 53 चेंडूत 82 धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. पाकिस्तानविरुद्ध त्याने 19व्या षटकात हॅरिस रौफ याच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला होता. त्यावेळी भारताला 9 चेंडूंत विजयासाठी 28 धावांची गरज होती. हॅरिसने त्या सामन्यात रोहित आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या फलंदाजांना बाद केले होते. मात्र, विराटपुढे त्याला गुडघे टेकावे लागले होते.
पाकिस्तानने केली प्लेइंग इलेव्हनची घोषणा
आशिया चषकात भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. पाकिस्तानने नेपाळविरुद्ध जो संघ उतरवला होता, तोच संघ भारताविरुद्धही उतरवला आहे. पाकिस्तानच्या संघात पाच खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच भारताविरुद्ध वनडेत खेळणार आहेत. यामध्ये मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, नसीम शाह, आगा सलमान आणि हॅरिस रौफ यांच्या नावाचा समावेश आहे. (asia cup 2023 virat kohli meets pakistan star bowler haris rauf ahead of india vs pakistan video viral)
हेही वाचाच-
जाळ अन् धूर संगटच! मार्शच्या झंझावाती फलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेने गमावली मालिका
बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच, पण कौतूकाची थापही जरूर द्या!