---Advertisement---

आशिया कप 2025 रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या मोठं कारण आलं समोर

On: शुक्रवार, मे 2, 2025 5:54 PM
Ind vs Pak
---Advertisement---

सध्या भारतात आयपीएल 2025 स्पर्धा शानदार पद्धतीने सुरू आहे. दुनियेतील स्टार खेळाडूंमुळे सजलेली ही स्पर्धा आता काही दिवसात संपेल. आयपीएल नंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. जिथे त्यांना 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर आशिया कप 2025 स्पर्धा सुरू होणार आहे. पण तत्पूर्वी या स्पर्धेवर संकटाचे सावट आले आहे. ही स्पर्धा रद्द होऊ शकते, ज्याचे मोठे कारण समोर आले आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान शिवाय बाकीचे आशियाई देश सहभागी होतील. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट अनुसार पहलगाम आतंकी हल्ल्यानंतर आशिया कप 2025 रद्द होऊ शकतो. याशिवाय भारतीय संघाचा बांगलादेश दौरा सुद्धा रद्द होऊ शकतो. बांगलादेश दौऱ्यावर टी20 मालिकेशिवाय वनडे मालिका सुद्धा खेळली जाणार होती, पण आता हा सुद्धा दौरा रद्द होऊ शकतो. पहलगाम हल्ल्यानंतर बांगलादेश दौरा आणि आशिया कप 2025 स्पर्धांवर संकटाचे सावट आहे.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध सक्त कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आशिया कप 2023 स्पर्धेचे यजमान पद पाकिस्तानच्या खांद्यावर होते, पण भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता.
त्यानंतर स्पर्धेचे यजमान पद पाकिस्तान आणि श्रीलंकाने सांभाळले होते. भारतीय संघाने त्यांचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळले होते. भारत-पाकिस्तान सामना सुद्धा श्रीलंकेत झाला होता.

भारताने हा सामना त्यांच्या नावावर केला होता आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून किताब त्यांच्या नावावर केला होता. याशिवाय भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभाग घेऊन पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी संघ गेला नव्हता. संघाने सर्वसामने दुबईमध्ये खेळले होते. तसेच अंतिम सामना सुद्धा न्यूझीलंडला पराभूत करून जिंकला होता. भारतीय क्रिकेट संघ 2008 नंतर पाकिस्तानमध्ये गेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---