भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तत्पूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताला 2025च्या टी20 आशिया चषकाचे यजमानपद मिळाले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेनं (ACC) यजमानपदाचा हक्क भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दिला आहे. 2025मध्ये ही स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. भारताला 34 वर्षांनंतर आशिया चषकाचे यजमानपद मिळाले आहे.
तर 2027मध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे आहे. ही एकदिवसीय स्पर्धा 50 षटकांची खेळवली जाणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे सहा संघ या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. सहावा संघ पात्रतेनुसार ठरवला जाणार आहे. 2027च्या आशिया चषक स्पर्धेत 13 सामने खेळले जाणार आहेत.
सध्या भारत आशिया चषकाचा गतविजेता आहे. शेवटच्या आशिया चषक स्पर्धेत भारतानं फायनलमध्ये श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला होता आणि आशिया चषकाची ट्राॅफी उंचावली होती. तेव्हा आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्ताननं हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केलं होतं. भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. भारतानं आपले सर्व सामने श्रीलंकेत तर पाकिस्ताननं काही सामने मायदेशात खेळले.
आगामी आयसीसी चॅम्पियन ट्राॅफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतू शेवटच्या आशिया चषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानमध्ये आशिया चषक खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे आगामी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतानं पाकिस्तानमध्ये जाण्याची शक्यता अद्याप दर्शवली नाही.
भारताला 34 वर्षांनंतर आशिया चषकाचे यजमानपद मिळाले आहे. भारतात शेवटचा आशिया चषक 1990-91 मध्ये झाला होता. ती आशिया चषकाची चौथी स्पर्धा होती. तेव्हा भारतानं कोलकातामध्ये श्रीलंकेचा पराभव करुन आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आशिया चषकातील चुकांमधून शिका! मिताली राजने भारतीय संघाला सांगितली आगामी विश्वचषकाची रणनितीकर्णधारपदी निवड न झालेल्या हार्दिक पांड्याला भारताच्या माजी ‘गुरू’चा मोलाचा सल्ला; म्हणाले…
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : भारत-अर्जेंटिना सामना सुटला बरोबरीत, शेवटच्या क्षणी हरमनप्रीतची चमकदार कामगिरी