आशिया चषक 2023चे सुपर 4 सामने खेळले जात असून मंगळवारी (12 सप्टेंबर) भारत आणि श्रीलंका आमने सामने आले. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकन संघाच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. अवघ्या 213 धावा करून भारताने 49.1 षटकात सर्व विकेट्स गमावल्या. श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेललागे याने भारताच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर बोलताना त्याने विराट कोहली याला बाद करणे आपले स्वप्न होते असे म्हटले.
भारतीय सलामीवीरांनी 11 व्या षटकापर्यंत 80 धावांची सलामी दिल्यानंतर वेललागे गोलंदाजीला आला. त्याने पहिल्याच चेंडूवर शुबमन गिल याला बाद केले. दुसऱ्या षटकात विराट कोहली तर तिसऱ्या षटकात रोहित शर्मा याचा त्याने त्रिफळा उडवला. त्यानंतर आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये केएल राहुल व हार्दिक पंड्या यांना देखील बाद केले. त्याने आपल्या दहा षटकांमध्ये फक्त 40 धावा दिल्या. विशेष म्हणजे त्यामध्ये एक षटक त्याने निर्धाव टाकले.
भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर मुलाखतीत बोलताना वेललागे म्हणाला,
“भारताच्या प्रमुख फलंदाजांना बाद करून आनंद झाला. मात्र, विराट कोहलीला बाद करणे हे माझे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले.”
आपले पहिले सुपर फोर सामने जिंकलेल्या या दोन्ही संघातील विजेता संघ अंतिम फेरीत दाखल होईल. त्यानंतर होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील विजेता दुसरा अंतिम फेरीतील संघ असेल. सलग दोन पराभव झाल्यामुळे बांगलादेश संघ यापूर्वीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे.
(Asia Cup Dunith Wellalage Said Virat Kohli Wicket Is My Dream)
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार रोहित सोडला तर अख्खा भारतीय संघ फेल! दुनिथ वेललागेने घेतलं विकेट्सचं पंचक
भारताकडून पराभव मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबर आझमचा सन्मान! तिसऱ्यांदा केली ‘ही’ कामगिरी