संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेतील सहावा सामना पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात रंगला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावत 193 धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान हे सलामीला आहे. तर बाबर 9 धावांवरच बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या फखर जमान याने विशेष खेळी केली.
फखर जमान (Fakhar Zaman) याने 41 चेंडूत 129.27च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 षटकाराच्या साहाय्याने 53 धावा केल्या. यामधील एक षटकार त्याने थेट स्टेडियमच्या बाहेर फटकारला आहे. याबरोबरच त्याने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 मधील आठवे शतक ठरले. त्याच्या या 101 मीटर षटकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. एहसान खान याने त्याला एजाज खान करवी झेलबाद केले.
फखरने दुसऱ्या विकेटसाठी यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) याच्यासोबत 116 धावांची भागीदारी रचली. फखर बाद झाल्यावर रिजवान आणि खुशदिल शाह यांनी हाँगकाँगच्या गोलंदाजांना त्रास देणे सुरूच ठेवले. रिजवानने 57 चेंडूत नाबाद 78 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. तर शाहने 233.33च्या स्ट्राईक रेटने खेळताना 15 चेंडूत 35 धावा केल्या. यावेळी त्याने 5 षटकार मारले.
https://youtu.be/V5XlXImxdoU
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामना बाद फेरीचा सामना होता. यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर फोरमध्ये प्रवेश करणार. तर पाकिस्तानने हा सामना तब्बल 155 धावांनी विजय मिळवत सुपर फोरमध्ये धडाक्यात प्रवेश केला आहे. तर सुपर फोरमधील पाकिस्तानचा सामना पुन्हा एकदा भारताशी होणार आहे. हा सामना दुबई येथे 4 सप्टेंबरला खेळला जाणार आहे.
तत्पूर्वी हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली आहे. शादाब खान याने 2.4 षटकात 8 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद नवाज याने 3, नसीम शाह याने 2 आणि शाहनवाज दहानी याने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या-