मागील अनेक दिवसांपासून पीसीबी व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यांच्या दरम्यान वाद सुरू असल्याचा दिसतो. भारतीय संघाने आशिया चषकासाठी पाकिस्तानात येण्याचे नाकारल्यानंतर, पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडताना दिसून येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, आता पाकिस्तान व श्रीलंका या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.
नियोजित कार्यक्रमानुसार या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान करणार होता. मात्र, भारतीय संघाने राजकीय परवानगी व सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानखत जाण्यास नकार दिला. बीसीसीआयने ही स्पर्धा युएई येथे आयोजित करण्याची मागणी केली होती. पाकिस्तानने त्यास नकार दिला. त्यानंतर पाकिस्तानने युएई व पाकिस्तान येथे स्पर्धा आयोजित करण्याच्या हायब्रीड मॉडेल सुचवले. त्यासाठी अफगाणिस्तान, बांगलादेश व श्रीलंकेने विरोध दर्शवला.
या सर्वनंतर आता आशियाई क्रिकेट परिषदेने या स्पर्धेतील नऊ सामने श्रीलंका येथे तर चार सामने पाकिस्तानात खेळवण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जाते. तसेच या प्रस्तावावर सर्व संघ सहमत आहेत.
या प्रस्तावानुसार पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका व श्रीलंका विरुद्ध बांगलादेश पाकिस्तानात खेळवण्यात येतील. तर अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर पाकिस्तान संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वनडे विश्वचषकात सहभागी होण्याकरिता भारतात येईल. तसेच विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाण्याची दाट शक्यता आहे.
(Asia Cup Hybrid Model Srilanka And Pakistan Host)
महत्वाच्या बातम्या –
कसोटीत पाचव्या दिवसाचा बॉस आहे कोहली! ‘ही’ आकडेवारी उंचावतेय चाहत्यांच्या अपेक्षा
सचिननंतर विराटच! WTC फायनलचा मौका साधून ‘किंग कोहली’ने केला महापराक्रम