संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष्य युएईत होणाऱ्या आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यावर आहे. रविवारी (11 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात हा महत्त्वपूर्ण सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आजवरचे आशिया चषकातील विजेते संघ कोण राहिले (Asia Cup Winners List) आहेत?, याबद्दल जाणून घेऊ…
आशिया चषकात (Asia Cup) भारतीय संघाचा सर्वाधिक दबदबा राहिला आहे. भारतीय संघ आशिया चषकातील (Asia Cup 2022) सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आतापर्यंत विक्रमी 7 वेळा आशिया चषक जिंकला आहे. तर श्रीलंकेचा संघ या स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांना 5 वेळा आशिया चषक जिंकता आला आहे. त्यानंतर पाकिस्तान संघाचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो. त्यांना 2 वेळा आशिया चषक जिंकता आला आहे.
दुसरीकडे बांगलादेशचा संघ सर्वाधिक कमनशीबी ठरला आहे. त्यांनी 3 वेळा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. परंतु त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तर अफगाणिस्तान संघ आजवर एकदाही अंतिम सामन्यात पोहोचू शकलेला नाही.
- आशिया चषकातील आजपर्यंतचे विजेते:
1983/84 – भारत
1985/86 – श्रीलंका
1988/89 – भारत
1990/91 – भारत
1994/95 – भारत
1997 – श्रीलंका
2000 – पाकिस्तान
2004 – श्रीलंका
2008 – श्रीलंका
2010 – भारत
2011/12 – पाकिस्तान
2013/14 – श्रीलंका
2016 – भारत (टी20)
2018 – भारत
2022 – ??? (टी20)
दरम्यान आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ आमने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2 वेळा हे संघ आशिया चषक जिंकण्यासाठी अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडले आहेत.
- 1986 मध्ये आशिया चषकाच्या दुसऱ्या हंगामातील अंतिम सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान संघ आमने सामने होते. या सामन्यात श्रीलंकेने 5 विकेट्सने विजय मिळवला होता.
- त्यानंतर 2000 साली दुसऱ्यांदा उभय संघ अंतिम सामन्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. यावेळी पाकिस्तानने मागील पराभवाचा वचपा काढत श्रीलंकेला 39 धावांनी पराभूत करत विजेतेपद जिंकले होते. हे पाकिस्तानचे पहिलेवहिले जेतेपदही होते.
- 2014 मध्ये तिसऱ्यांदा श्रीलंका आणि पाकिस्तान संघात आशिया चषकाचा अंतिम सामना झाला होता. यावेळी श्रीलंकेने 5 विकेट्सने विजय मिळवला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वयाच्या 36 व्या वर्षीही स्टुअर्ट ब्रॉडची गाडी सुसाट! केली माजी दिग्गजाच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
‘आम्ही हा सामना जबरदस्तीने खेळलो!’ पहिल्या टी20त पराभवानंतर हरमनप्रीत कौरने केला खुलासा
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी