---Advertisement---

पीसीबी अध्यक्ष जरा सांभाळून! जय शाहांवर लावलेले आरोप, आता बोर्डाने ‘अशी’ केली बोलती बंद

Najam-Sethi-And-Jay-Shah
---Advertisement---

आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी (दि. 05 जानेवारी) दोन वर्षांसाठी एसीसीचे 2023-24 साठीचे वेळापत्रक जारी केले. यामध्ये आशिया चषक 2023चे वेळापत्रकही सामील आहे. 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळला जाणारा आशिया चषक यावर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे. मात्र, या वेळापत्रकाची आणि यजमान देशाची घोषणा करण्यात आली नाहीये. अध्यक्ष जय शाह यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.

जय शाह (Jay Shah) यांच्या या पोस्टवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) अध्यक्ष नजम सेठी (Najam Sethi) यांनी तिखट भाष्य करत ट्वीट केले. नजम सेठी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर जय शाह यांची पोस्ट शेअर करत लिहिले की, “आशियाई क्रिकेट परिषदेचा (Asian Cricket Council) 2023-24 वेळापत्रकाचा आराखडा जारी करण्यासाठी धन्यवाद जय शाह. विशेषत: आशिया चषक 2023चे यजमान पाकिस्तान आहे. तुम्ही आमच्या पीएसएल 2023चेही वेळापत्रक जारी करू शकता. याचे उत्तर लवकर दिले, तर बरे होईल.”

नजम सेठी यांच्या या वक्तव्यावर आता आशियाई क्रिकेट परिषदेने निवेदन जारी केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “एसीसीने गुरुवारी एसीसी 2023-24च्या वेळापत्राची घोषणा केली. आम्हाला समजले की, पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी एसीसी अध्यक्षांनी जारी केलेल्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्यास आणि त्याची घोषणा करण्यावर एकतर्फी निर्णय घेण्याबाबत वक्तव्य केले आहे. एसीसी स्पष्ट करते की, त्यांनी ठरलेल्या योग्य प्रक्रियेचे पालन केले आहे. 13 डिसेंबर, 2022 रोजी झालेल्या बैठकीत विकास समिती, वित्त आणि विपणन समितीने वेळापत्रकाला मंजुरी दिली.”

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “22 डिसेंबर, 2022 रोजी वेळापत्रकाला एका ई-मेलच्या माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह इतर भाग घेणाऱ्या सर्व सदस्यांना वैयक्तिकरीत्या सुचना देण्यात आली होती. त्यावेळी काही सदस्य बोर्डांकडून प्रतिक्रियाही मिळाल्या होत्या. मात्र, पीसीबीकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा सल्ला मिळाला नव्हता. अशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेठी यांनी केलेले भाष्य आधारहीन आहे. तसेच, एसीसी याचे खंडन करते.”

विशेष म्हणजे, पाकिस्तान यावर्षीच्या आशिया चषकाचा मूळ यजमान आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे तिथे खेळण्यास इच्छुक नाहीये. (asian cricket council rejects najam sethis allegations says pcb was informed about calendar read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात दुसऱ्यांदा चमकला शनाका, आधी धोनी आणि आता कर्णधार हार्दिकला दिला धक्का
‘नो- बॉल हा गुन्हाच…’, टीम इंडियाने दुसरा टी20 गमावताच हार्दिक पंड्याचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---