जकार्ता | १८ आॅगस्टपासून सुरु होत असलेल्या १८व्या एशियन गेम्समधील कबड्डी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
या स्पर्धेत पुरुषांचे एकुण ११ तर महिलांचे ९ संघ सहभागी होणार आहेत. पुरुषांचे आणि महिलांचे मिळुन एकुण ४७ सामने या स्पर्धेत होणार आहे.
साधारणत: महिलांचे सामने हे सकाळच्या सत्रात तर पुरुषांचे सामने संध्याकाळच्या सत्रात होणार आहेत.
स्पर्धेची सुरुवात १९ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भारत विरुद्ध जपान या महिलांच्या सामन्याने होणार आहे.
पुरुषांच्या स्पर्धेचे उद्धाटनही भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याने १९ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता होईल.
भारतीय पुरुष संघाचे साखळी फेरीचे सामने-
साखळी फेरीत भारतीय पुरुष संघ १९ आॅगस्टला रोजी बांगलादेश (दु. २ वाजता ) आणि श्रीलंका (रात्री ७ वाजता), २० आॅगस्टला कोरिया (सायंकाळी ४ वाजता), २१ आॅगस्टला थायलंड (सायंकाळी ५ वाजता) साखळी सामने खेळणार आहे.
भारतीय महिला संघाचे साखळी फेरीचे सामने-
भारतीय महिला संघ १९ आॅगस्टला रोजी जपान (सकाळी ९ वाजता ), २० आॅगस्टला थायलंड (सकाळी १०.४० वाजता), २१ आॅगस्टला श्रीलंका (सकाळी ९ वाजता) आणि इंडोनेशिया (दुपारी १२.३० वाजता )साखळी सामने खेळणार आहे.
१९ ते २२ आॅगस्ट या काळात ४१ लीग सामने संपल्यावर २३ आॅगस्ट रोजी पुरुष आणि महिला सेमीफायनलचे प्रत्येकी २ सामने होणार आहे. अ गटाचा विजेता ब गटाच्या उपविजेत्याशी सेमीफायनल१ मध्ये तर अ गटाचा उपविजेता ब गटाच्या विजेत्याशी सेमीफायनल २मध्ये भीडणार आहे.
अंतिम फेरीचा महिलांचा आणि पुरुषांचा सामना २४ आॅगस्ट रोजी होणार आहे.
एशियन गेम्स २०१८ कबड्डी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर.
एकूण सामने ४७.
साखळी फेरीचे सामने- ४१
सेमीफायन- ४
फायनल- २
एकुण पुरुषांचे संघ- ११
एकुण महिलांचे संघ-९ #म #मराठी #AsianGames2018 #Asiangames pic.twitter.com/qOXq4bpYzP— Sharad Bodage (@SharadBodage) August 17, 2018
असे आहेत पुरुष संघाचे गट-
अ गट- भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश, थायलंड आणि श्रीलंका
ब गट- इरान, पाकिस्तान, इंडोनेशिया, जपान, नेपाळ आणि मलेशिया
असे आहेत महिलांचे गट-
अ गट- भारत, थायलंड, जपान, श्रीलंका आणि इंडोनेशिया
ब गट- इरान, बांगलादेश, दक्षिण कोरिया आणि तैवान
एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेले ११ पुरुष संघ:
भारत, इंडोनेशिया, इराण, इराक, जपान, कोरिया, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, बांगलादेश
एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेले ९ महिला संघ:
भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, इराण, जपान, कोरिया, श्रीलंका, थायलंड, तैवान.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये
–तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ!
–खास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी