यावर्षी चीनच्या हांग्जो येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने या स्पर्धांसाठी भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ पाठवण्यास थेट नकार दिला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयने हा निर्णय व्यस्त क्रिकेट वेळापत्रक पाहून घेतले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 (Asian Games) चीनमध्ये होणार होत्या. मात्र, चीनच्या शून्य कोरोना योजनेमुळे मागील वर्षी या स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नव्हते. आता आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर यादरम्यान होणार आहेत. त्याचबरोबर टी20 क्रिकेटचेही आयोजन होणार आहे.
आशियाई क्रीडा मिशनचे भारताचे प्रमुखे मिशन भूपेंदर बाजवा यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीसीसीआयच्या भारतीय क्रिकेट संघ चीनला न पाठवण्यामागील कारण सांगितले. त्यांनी पुष्टी केली की, क्रिकेट सोडून भारत जवळपास प्रत्येक खेळात सहभागी होईल. ते म्हणाले की, “एक खेळ (क्रिकेट) सोडून आमच्याकडे सर्व खेळांचा प्रवेश आहे. संघ व्यस्त असेल. आम्ही त्यांना 3-4 मेल पाठवले. मात्र, जेव्हा आम्हाला आयोजकां सांगितले की, भारतातून किती खेळाडू आणि संघ सहभाग घेणार आहेत, तेव्हा बीसीसीआयने म्हटले की, ते जाणार नाहीत.”
माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयला प्रवेशाची यादी पाठवण्याच्या मुदतीच्या एक दिवसाआधी ऑलिम्पिक संघाकडून माहिती मिळाली होती. तसेच, आधीपासूनच भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे.
भारतात होणार आहे विश्वचषकाचे आयोजन
भविष्यातील वेळापत्रकानुसार सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान भारताला आशिया चषक खेळायचा आहे. ऑस्ट्रेलियाचे यजमानपदही भूषवायचे आहे. याव्यतिरिक्त ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे विश्वचषक भारतातच खेळला जाणार आहे. या काळात भारतीय महिला क्रिकेट संघालाही दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे.
बीसीसीआयने यापूर्वीही पाठवला नव्हता संघ
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 2010 आणि 2014मध्ये क्रिकेटचा सहभाग होता. मात्र, बीसीसीआयने तेव्हाही महिला किंवा पुरुषांचा क्रिकेट संघ स्पर्धेसाठी पाठवला नव्हता. जकार्तामध्ये 2018साली आशियाई क्रीडा स्पर्धा बाहेर झाल्यानंतर हांग्जो क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाला आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये न पाठवण्याच्या निर्णय घेतला आहे. (asian games 2022 bcci refuses to send their mens womens cricket teams to compete in asiad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाच पराभवांनी गांगुलीची हवा झालेली टाईट, दिल्लीने विजय मिळवताच म्हणाला, ‘माझी पहिल्या कसोटीतील धाव…’
‘अजिंक्य रहाणे स्मार्ट क्रिकेटर, त्याने टी20 क्रिकेटमध्ये…’, गोलंदाजांना घडवणाऱ्या दिग्गजाचे वक्तव्य