पुणे – महिलाच्या राष्ट्रीय लीग फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत पुण्याच्या अस्पायर एफसी संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी नवी मुंबईच्या फुटबॉल स्कूल ऑफ इंडियाचा (एफएसआय) ७-० असा पराभव केला. मुंबई येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन विजयानंतर अस्पायर एफसीचे आता सहा गुण झाले आहेत.
अस्पायरकडून गीता दासने (५८ आणि ७७वे मिनिट) दोन गोल केले. अस्पायरकडून सहा खेळाडूंनी गोल केले. एकतर्फी झालेल्या सामन्यात अस्पायरच्या खेळाडूंनी नवी एफएसआयच्या खेळाडूंना फारशी संधीच दिली नाही. वैष्णवी बराटेने २०व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर मुरिएल ऍडमने वैष्णवीच्या पासवर गोल करून संघाची आघाडी २-० अशी वाढवली.
मध्यंतराला २-० अशा आघाडीवर राहिलेल्या अस्पायरच्या खेळाडूंनी उत्तरार्धात अधिक आक्रमक खेळ केला. त्यांच्या वेगवान चालींनी एफएसआयची बचावफळी कोलमडून पडली. ठराविक अंतराने गोल करत अस्पायरने सामन्यावीरल आपले वर्चस्व कायम राखले. यातही वैष्णवीचा खेळ अधिक लक्षवेधक होता. तिच्याच आणखी एका पासवर या वेळी गीताने गोल केला. त्यानंतर ६८व्या मिनिटाला सानिया व्ही. एस. हिने देखिल एफएसआयच्या बचावफळीची कसोटी पाहिली. पुढे गीताने डाव्या बगलेतून वेगाने पुढे गेलेल्या सपनाची चाल सार्थकी लावताना वैयक्तिक दुसरा आणि संघाचा पाचवा गोल केला. सपनाने मग ८४व्या मिनिटाला उजव्या कोपऱ्यातून विलक्षण किक मारत अस्पायरचा सहावा गोल केला. भरपाई वेळेच्या दुसऱ्या मिनिटाला राखीव खेळाडू म्हणून उतरललेल्या अजुषा शिरीनने आणखी एक गोल करून अस्पायरचा मोठा विजय साकारला.
निकाल : अस्पायर एफसी ७ (वैष्णवी बराटे २०वे, मुरिएल ऍडम ४५+४वे, गीता दास ५८वे, ७७वे मिनिट, सानिया व्ही एस ६८वे मिनिट, सपना राजपुरे ८४वे मिनिट, अजुषा शिरीन ९०+२रे मिनिट) वि.वि. फुटबॉल स्कूल ऑफ इंडिया (एफएसआय) ०
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नेमके याला म्हणावे तरी काय? फलंदाजाने खेळलेला शॉट पाहून चाहते पडले कोड्यात
रोहित शर्माचा मार्ग मोकळा, कर्दनकाळ ठरलेला ‘हा’ श्रीलंकन गोलंदाज आशिया चषकातून बाहेर!
हे पाप कुठे फेडणार? विजयानंतरही पाकिस्तानवर होतोय चिटींग केल्याचा आरोप, जाणून घ्या कारण