आसाम राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारताची युवा धावपटू हिमा दास हिला राज्याची पोलिस उपअधिक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (१० फेब्रुवारी) गुवाहाटीच्या जनता भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
याचबरोबर सोनोवाल यांच्या मंत्रिमडळाने राज्यातील एकात्मिक क्रिडा धोरणात सुधारणा करण्याचेही ठरवले आहे. त्या अनुशंगाने त्यांनी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील क्लास-१ आणि क्लास-२ अधिकाऱ्यांच्या पदासाठी क्रिडापटूंना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. क्रिडामंत्री किरण रिजिजू यांनी आसाम सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हिमा दासविषयी थोडेसे…
हिमा दास ही आसामच्या नगाव जिल्ह्यातील धिंग गावची राहणारी आहे. तिचे वडील एक सामान्य शेतकरी असून ते भाताची शेती करतात. ती आपल्या ६ भावा-बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. हिमा लहान असताना मुलांसोबत फुटबॉल खेळत असायची आणि तिला मोठे झाल्यानंतर प्रसिद्ध स्ट्राईकर बनायचे होते. परंतु पुढे तिने धावपटूच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि मोठे यशही साध्य केले.
Assam govt decides to appoint sprinter Hima Das as DSP
Read @ANI Story | https://t.co/3PbOWfGWBX pic.twitter.com/qfICrNrr2P
— ANI Digital (@ani_digital) February 11, 2021
हिमाने २०१८ मध्ये फिनलँड येथे २० वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशीपमध्ये जागतिक विजेतेपद जिंकले होते. अशी मोलाची कामगिरी करणारी हिमा भारताची पहिलीच धावपटू आहे. २० वर्षीय हिमाने २०१८मध्ये २० वर्षांखालील विश्वविजेतेपदाव्यतिरिक्त जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटरमध्ये रौप्य, चार वेळा ४०० मीटरमध्ये रिले आणि चार वेळा ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी तिला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjun Award) मिळाला होता.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
महत्त्वाच्या बातम्या-
खेल रत्न पुरस्कारासाठी हिमा दासच्या नावाची शिफारस; बनली सर्वात युवा ऍथलीट…
एक फूटबाॅलर ते विश्व विजेती- जाणुन घ्या हिमा दासचा थक्क करणारा प्रवास