fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खेल रत्न पुरस्कारासाठी हिमा दासच्या नावाची शिफारस; बनली सर्वात युवा ऍथलीट…

Indian Sprinter Hima Das Nominated for Khel Ratna Award

आसाम शासनाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताची युवा धावपटू हिमा दासच्या नावाची शिफारस केली आहे. शुक्रवारी (५ जून) आसामचे क्रीडा सचिव दुलाल चंद्र दास यांनी क्रीडा मंत्रालयाला हिमाच्या नावाचे शिफारसपत्र पाठविले होते.

मागील २ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या हिमाचे (Hima Das) मूळ गाव आसाममधील धिंग हे आहे. आतापर्यंत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी (Rajiv Gandhi Khel Ratna Award) शिफारस करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये केवळ २० वर्षे वय असणारी हिमा सर्वात युवा खेळाडू आहे.

हिमाने २०१८ मध्ये फिनलँड येथे २० वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशीपमध्ये जागतिक विजेतेपद जिंकले होते. अशी मोलाची कामगिरी करणारी हिमा भारताची पहिलीच धावपटू आहे.

हिमाव्यतिरिक्त भालाफेकपटू नीरज चौप्रा, पहेलवान विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) या खेळाडूंची देशाच्या सर्वोच्च राजीव गांधी पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

२० वर्षीय हिमाने २०१८मध्ये २० वर्षाखालील विश्वविजेतेपदाव्यतिरिक्त जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर रौप्य, चार वेळा ४०० मीटर रिले आणि महिला चार वेळा ४०० मीटर सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी तिला २०१८मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjun Award) मिळाला होता. 

ट्रेंडिंग घडामोडी-

-इम्रान खानच्या पावलांवर पाऊल टाकत ‘या’ क्रिकेटरला बनायचे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान!

-गांगुलीने फोन करुनही ‘त्याने’ दिला होता खेळण्यास नकार; हे होते कारण

-अवघ्या ७ मिनीटात गॅरी कर्स्टन झाले होते टीम इंडियाचे कोच, पहा कसे

You might also like