सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. पहिला सामना बेंगळुरूच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून धुव्वा उडवला, तर दुसऱ्या पुणे कसोटीतही न्यूझीलंडने वर्चस्व गाजवत 113 धावांनी सामना जिंकला. या विजयासह न्यूझीलंडने 2-0 ने आघाडी घेत मालिका आपल्या खिशात घातली. दोन्ही सामन्यात भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) फ्लाॅप ठरले. त्यावर सहायक प्रशिक्षक करूण नायर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
करूण नायर म्हणाले की, ““मी स्वत: एक अव्वल खेळाडू राहिलो आहे आणि म्हणून जेव्हा कोणी या प्रवासातून गेले आहे, कधीकधी त्यांना त्यांची जागा देणे आणि ते परत येतील यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. ते कठोर परिश्रम करतील. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. प्रत्येकाला चांगली कामगिरी करायची असते. विराट कोहली असो, रोहित शर्मा असो किंवा इतर कोणीही प्रयत्न करत असतो”
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन दिवस आधी बुधवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पत्रकार परिषदेत नायर म्हणाले, “मला वाटते की ते कठोर परिश्रम करत आहेत आणि काहीवेळा तुम्हाला महान खेळाडूंसह थोडा संयम ठेवावा लागेल आणि त्यांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागेल आणि मला खात्री आहे की लवकरच आमच्याकडे इतर सर्वांचे समान कौतुक करण्यासाठी बरेच काही असेल.”
पुढे बोलताना नायर म्हणाला, “जेव्हा तुम्ही भारताकडून खेळत असता, जेव्हा ही जर्सी घालता तेव्हा तुमच्यावर दबाव असतो. प्रत्येक आठवडा महत्त्वाचा आहे. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. मी सपोर्ट स्टाफच्या वतीने बोलत आहे आणि आम्ही डब्ल्यूटीसी किंवा ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल विचार करण्यात संकुचित विचार करत नाही. मला वाटतं वानखेडेवर होणारा हा सामना आमच्यापुढे आहे. आशा आहे की देशांतर्गत परिस्थिती माझ्यासाठी आणि संघासाठी अनुकूल असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
4 महिन्यातच दिग्गजाने दिला राजीनामा, भारतीय खेळाडूची भविष्यवाणाी ठरली खरी!
आरसीबीच्या संघात ‘या’ विस्फोटक खेळाडूची एँट्री
IND vs NZ; भारताविरूद्ध घातला होता धुमाकूळ! मुंबई कसोटीपूर्वी न्यूझीलंड फिरकीपटू भावूक